Advertisement

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त गण्यारपवार फाउंडेशन, चामोर्शी तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर व महात्मे आय हॉस्पिटल नागपूर यांचा सहभाग

 

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
येणापूर प्रतिनिधी



मौजा येणापूर (ता. चामोर्शी) येथे राष्ट्रीय कर्करोग (कॅन्सर) जागरूकता दिनाचे औचित्य साधून गण्यारपवार फाउंडेशन, चामोर्शी यांच्या वतीने HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर व महात्मे आय हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथील तज्ज्ञ डॉ. नितीन बोमनवार, डॉ. साहू आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने कॅन्सर तपासणीसाठी आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहून एकूण १०७ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी ६ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला.

महात्मे आय हॉस्पिटल नागपूर येथील डॉ. अरविंद डोंगरवार आणि त्यांच्या टीमने ७६० रुग्णांची नेत्र तपासणी केली. त्यापैकी काहींना औषधोपचार सुचविण्यात आले, ४३७ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तर ९६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.

गण्यारपवार फाउंडेशनचे अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जातात. आतापर्यंत २० ठिकाणी कॅन्सर व नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली असून, पुढेही ही सेवा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

मार्गदर्शन करताना अतुलभाऊ गण्यारपवार म्हणाले, “कॅन्सरचा उपचार महागडा असतो आणि सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जातो. त्यामुळे HCG हॉस्पिटल आणि गण्यारपवार फाउंडेशनच्या माध्यमातून अशा रुग्णांना उपचाराची सोय केली जाणार आहे. शासनाच्या योजनांमधून काही खर्च भागवला जाईल आणि उर्वरित खर्च फाउंडेशन उचलेल.”

डॉ. नितीन बोमनवार यांनी सांगितले की, “तंबाखू आणि सिगारेटचे सेवन हे कॅन्सरचे प्रमुख कारण असून, त्यापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. दुर्गम भागात आरोग्यसेवेचे हे कार्य करणाऱ्या गण्यारपवार फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन.”

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. राजू आत्राम (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. अमोलभाऊ गण्यारपवार (संचालक, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक व नगरसेवक, चामोर्शी नगरपंचायत), मा. करणभाऊ गण्यारपवार (अध्यक्ष, विकास तांदुळ गिरणी घोट), सौ. सुनिता रविंद्र बंडावार, राजू एग्लोपवार, राहुल एग्लोपवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रुषीजी पा. गौरकार (अध्यक्ष, सेवा संस्था मुधोली), बाबुराव बकाले, राजुभाऊ बंडावार (माजी सरपंच, अडयाळ), कृष्णा मंडल, धाठुजी शिडाम, नंदाजी कोडापे, चंदू पुच्छलवार, गुलाब धोती, लक्ष्मण शिडाम, आकाश बंडावार, शंकर नैताम, मोरेश्वर घोडाम, रविंद्र बंडावार, स्वप्नील नैताम, विशेषराव कोडापे, सुनिल पुच्छलवार, राहुल गुरुकर, पिंपळशेंडे आदी मान्यवरांची होती.

या आरोग्य शिबिरामुळे येणापूर व परिसरातील जनतेत आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या विचाराने गण्यारपवार फाउंडेशनचे समाजकार्य उल्लेखनीय ठरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या