पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोमल बेवफा निघाली, 5 जणांसोबत लग्न करुन मधुचंद्रही साजरा केला, पण….

इमेज
कोमल बेवफा निघाली, 5 जणांसोबत लग्न करुन मधुचंद्रही साजरा केला, पण…. दरारा 24 तास न्युज नेटवर्क लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास दिवस असतो. लग्नाची गाठ ही जन्मोजन्मीसाठी बांधली जाते. लग्नानंतर माणसाने सुखी आयुष्याची स्वप्न पाहिलेली असतात. पण काहीवेळा लग्नानंतर ठरवलय तसं घडत नाही. नियतीने काहीतरी वेगळच ठरवलेलं असतं. कर्नाटकच्या गुब्बी पोलिसांनी एक रॅकेटची पोलखोल केलीय. लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु होती. गँगमधील एका महिलेने एकदा-दोनदा नाही, तर चक्क पाच व्यक्तींसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केली. पोलिसांना सतत या बद्दल तक्रारी येत होत्या. या गँगचे सदस्य पोलिसांच्या हाताला लागले आहेत. पोलिसांनी नवरीसह तिचे दोन साथीदार आणि लग्न लावून देणाऱ्या दलालाला अटक केलीय. कर्नाटकसह महाराष्ट्रातही या गँगने लोकांची फसवणूक केली होती. लग्न करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या या गँगच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. कृषी तज्ज्ञ पलक्षैया यांनी गुब्बी पोलिसात नोव्हेंबर 2023 मध्ये तक्रार नोंदवली होती. कोमल आणि अन्य विरोधात लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. पोलीस तेव्हापासूनच या ...

*सायबर भामट्याचा भयानक सापळा तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत* - *अॅड. चैतन्य भंडारी*

इमेज
* सायबर भामट्याचा भयानक सापळा तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत* - *अॅड. चैतन्य भंडारी* जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ दरारा 24 तास  सर्वसामान्य माणसे "पोलीस" म्हटलं की निम्मेअधिक आधीच घाबरून जातात आणि त्यात परत तुमच्या नावावर "अमली पदार्थ" तस्करी असं काहीतरी समोर आलं उरले सुरले धैर्य पण गळून जाते सायबर भामटे लोकांना हे माहित असत. त्याचाच फायदा घेऊन ते लोक तुम्हाला जाळ्यात खेचतात आणि मग तुम्ही समोरचा जे जे काही सांगेल ते भीतीपोटी करत जाता आणि शेवटी लाखो रुपये तर लुटले जातातच शिवाय शारीरिक शोषणाला सामोरे जावे लागते त्यातून पुढे मग इमोशनल ब्लॅक मेल करून पुन्हा पैसे उकळले जातात. तर आधी समजून घ्या की हा अमली पदार्थ पार्सलचा सापळा आहे कसा ? तर तुम्हाला एक फोन येतो की, आम्ही विमानतळावरील अमली पदार्थ नियंत्रण कक्षातून अमुक तमुक निरीक्षक बोलतोय. आणि तुमच्या नावाने एक पार्सल परदेशात पाठवलं जात आहे. त्याचा आम्हाला संशय आल्याने स्कॅन केले असता त्यात अमली पदार...

चिमूर शहरातील पिंपळनेरी कांपा वरोरा मार्गांवरील टि पॉईंट ला छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नामकरण

इमेज
चिमूर शहरातील पिंपळनेरी कांपा वरोरा मार्गांवरील टि पॉईंट ला छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नामकरण ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर             7887325430 चिमुर : - अनेक वर्षांपासून हजारे पेट्रोल पंप जवळील टि पॉईंट चौकाला कसल्याही प्रकारे नगर परिषदेने ओळख पटावी म्हणून चौकाला नामकरण करण्यात आले नव्हते म्हणून जनतेने चिमूर शहरातील पिंपळनेरी कांपा वरोरा मार्गांवरील टि पॉईंट ला नामकरण करण्याचे ठरविले आणि आज दिनांक.२६/०८/२०२४ ला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. यावेळी पवन बंडे , स्नेहल शंभरकर ,विशाल कुबडे ,प्रज्वल बोबडे ,राकेश साटोने , बंटी कोरेकार ,रोशन येळने , प्रशांत डवले ,अमोल चौके ,अमोल गोठे , पवन डुकरे ,सुमित भिडेकर , विशाल कुबड़े ,पवन ताकसाडे ,विलास मोहिनकर , सुभाष मोहिनकर ,सचिन डांगे ,प्रविन हजारे,सुभाश बंडे , चिराग काथोडे , विशाल कुबडे , गणेश गोठे व आदींची उपस्थित होते.

सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांच्या मागणीची दखल 👍 पोंभुर्णा ते मूल मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

इमेज
सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांच्या मागणीची दखल पोंभुर्णा ते मूल मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू चंद्रपूर समाचार मीडिया वृत्ताची दखल पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी  पोंभुर्णा ते मूल मार्गावरील देवाडा खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे मोठमोठ्या वाहनांची व छोट्या वाहनधारकांची अपघात होण्याची दाट शक्यता होती.  ही समस्या लक्षात घेऊन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व जामतुकूम ग्रामपंचायतचे माजी सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी सदर खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागृत करण्याचे काम केले.  त्यांनी मीडियाच्या माध्यमातून सदर धोका प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यांच्या या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने प्रवाशांनी व नागरिकांनी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागालाही उशिरा का होईना जाग आल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आहे. ====================== ======================

उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस

इमेज
उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस  चंद्रपूर: (विशेष प्रतिनिधी)  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  महिलांवरील अत्याचार दिवसागणिक वाढत चालले आहेत. राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार सुरू आहेत. मात्र सरकार आणि यंत्रणा या सर्व घटना मूग गिळून पाहत आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना घडली आली आहे. दुकानाची उधारी फेळण्यासाठी एका नराधमाने सोळा वर्षीय मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करून तिला तीन महिन्याची गर्भवती केले. बबन रोहनकर राहणार दुर्गापूर असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या हालचालीवरून व शरीरातील बदलावरून आईच्या लक्षात येतात तिने रुग्णालयात घेऊन गेले असता मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. आणि त्यामुळेच हा प्रकार उघड झाला. ====================== ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________

सदैव बहिणींच्या संरक्षणासाठी भांगडिया परिवार खंबीरपणे उभा राहील-आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया... चिमूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामाच्या कामावर विश्वास ठेवूनच हजारोंच्या संख्येने बहिणी आपल्या पाठीशी... - सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी.

इमेज
सदैव बहिणींच्या संरक्षणासाठी भांगडिया परिवार खंबीरपणे उभा राहील-आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया... चिमूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामाच्या कामावर विश्वास ठेवूनच हजारोंच्या संख्येने बहिणी आपल्या पाठीशी... - सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी रक्षाबंधन कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती... चिमूर:- शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर                  7887325430         रक्षा बंधनाचा कार्यक्रम हा बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव आहे, आपण हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करीत असतो, बहिणींच्या संरक्षण करण्यासाठी आपण सदैव तप्तर असेन, शेवटच्या श्वासापर्यंत बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे मत आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी व्यक्त केले. तालुका भाजपा महीला आघाडी चिमूरच्या वतीने चिमूर कॉटन इंडस्ट्रीजच्या भव्य परीसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यात हजारो बहीणीनी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांना औक्षवण करुन हजारों बहिणींनी राख्या बांधल्या. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मान्यवरांनी देश बांधवांना दिलेल्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मान्यवरांनी देश बांधवांना दिलेल्या हार्दिक शुभेच्छा ====°=°°========================= ________________________________ ________________________________ ________________________________ _______________________$________ ________________________________ _____________________________$$ ________________________________ ________________________________ ________________________________

पत्नीपाठोपाठ पतीचीही विहिरीत उडी दोघांचाही दुर्दैवाने मृत्यू

इमेज
पत्नीपाठोपाठ पतीचीही विहिरीत उडी दोघांचाही दुर्दैवाने मृत्यू चंद्रपूर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून त्यात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पत्नीने अज्ञात कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने तत्काळ विहिरीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला. Daraara 24 Taas प्रकाश ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश आणि उषाचा आंतरजातीय विवाह तीन महिन्यांपूर्वीच झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात मुल येथे धरणे आंदोलन

इमेज
महाविकास आघाडीचे आज मूल नगरीत कांग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांच्या नेतृत्वात गांधी चौकात धरणे आंदोलन! मुल: प्रतिनिधी आज मूल नगरीत कांग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत रावत यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन आयोजित केले . दरम्यान या आंदोलनात प्रामुख्याने राकेश रत्नावर,घनश्याम येणूरकर, दत्तात्रय समर्थ, प्रभाकर कावडे, अतुल गोवर्धन विरई, बाळू करपे , अनिल निकोडे,संदीप मोहबे, विष्णू साधवमवार, रुपाली संतोषवार, समता बन्सोड, फर्जाना शेख, राजू कन्नमवार, विवेक मुत्यलवार, महेश चौधरी अनिल सोनूले, आदिं सहभागी झाले होते.

बदलापूरसह महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पोंभुर्ण्यात निषेध आंदोलन

इमेज
बदलापूरसह महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पोंभुर्ण्यात निषेध आंदोलन पोंभुर्णा: (विशेष प्रतिनिधी)      बदलापूरसह पुणे, चंद्रपूर,अकोला, नाशिक, आरमोरी,कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चिमुकल्या मुलींवर अमानुष अत्याचार झाले. महाराष्ट्रात लहान मुलींवर, माता भगिनींवर अमानुष अत्याचार होत असताना सरकार मात्र केवळ राजकारणात आणि सत्ताकारणात व्यस्त आहे. या अत्याचारांचा व सरकारच्या असंवेदनशीलतेचा धिक्कार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एक तासाचे "मुक आंदोलन "करण्यात आले. पोंभूर्णा शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकातील सावित्रीमाई फुलेच्या प्रतिमेला वंदन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासूदेव पाल, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार ,शहर अध्यक्ष अशोक गेडाम, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमेशवर पदमगिरीवार, नगरसेवक बालाजी मेश्राम,अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे, धम्मा निमगडे,वैभव पिंपळशेंडे,पराग मुलकलवार, भुजंग ढोले, आनंदराव पातळे, सद्गुरु ढोले,महेश श्रिगीरीवार, जयपाल गेडाम,दिव्या ...

उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

इमेज
उच्च न्यायालयाने शनिवारचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला, मात्र शनिवारी ते स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून निषेध करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. शुक्रवारी दुपारी बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा संध्याकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्या सकाळी ११ वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही. त्याला मनाई केली तर जनतेचे न्यायालय आहे. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. साभार....

रक्षाबंधन कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी येणार २४ ऑगस्ट ला चिमूर नगरीत.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थित रक्षाबंधन कार्यक्रम चिमूर कॉटन इंडस्ट्रीज (कॉटन मिल) मध्ये होणार.

इमेज
रक्षाबंधन कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी येणार २४ ऑगस्ट ला चिमूर नगरीत. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थित रक्षाबंधन कार्यक्रम चिमूर कॉटन इंडस्ट्रीज (कॉटन मिल) मध्ये होणार. ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर            7887325430 चिमूर       भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मोठया संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी केले आहे.    दरवर्षी प्रमाणे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केले जात असून दिनांक २४ ऑगस्ट २४ शनिवार दु १२ वा. रक्षाबंधन कार्यक्रम स्थळ गदगाव रोड कडील चिमूर कॉटन इंडस्ट्रीज (कॉटन मिल) च्या परिसरात घेण्यात येत आहे. या कार्यक्रमास महिलांच्या खास भेटीला मराठी सिने अभिनेत...