बदलापूरसह महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पोंभुर्ण्यात निषेध आंदोलन
बदलापूरसह महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पोंभुर्ण्यात निषेध आंदोलन
पोंभुर्णा: (विशेष प्रतिनिधी)
बदलापूरसह पुणे, चंद्रपूर,अकोला, नाशिक, आरमोरी,कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चिमुकल्या मुलींवर अमानुष अत्याचार झाले. महाराष्ट्रात लहान मुलींवर, माता भगिनींवर अमानुष अत्याचार होत असताना सरकार मात्र केवळ राजकारणात आणि सत्ताकारणात व्यस्त आहे.
या अत्याचारांचा व सरकारच्या असंवेदनशीलतेचा धिक्कार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एक तासाचे "मुक आंदोलन "करण्यात आले.
पोंभूर्णा शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकातील सावित्रीमाई फुलेच्या प्रतिमेला वंदन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासूदेव पाल,शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर अध्यक्ष अशोक गेडाम, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमेशवर पदमगिरीवार,नगरसेवक बालाजी मेश्राम,अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे, धम्मा निमगडे,वैभव पिंपळशेंडे,पराग मुलकलवार, भुजंग ढोले, आनंदराव पातळे, सद्गुरु ढोले,महेश श्रिगीरीवार, जयपाल गेडाम,दिव्या रणदिवे, हिमांशू गेडाम, महादेव सोमनकर ,शरद पोलजवार,सुनील कुंदोजवार,राहुल देवताळे,दिलीप जिलकुंडवार व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा