पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार

इमेज
*मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार!* पुणे, मूल, प्रतिनिधी.... *जागृत ग्राहक राजा* या सामाजिक ग्राहक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या  समारोप समारंभात, दिनांक २३फेब्रुवारी २०२५रोजी पुणे येथे ग्राहक चळवळीतील ५ आघाडीच्या कार्यकर्त्यांना  *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यात  १.दीपक देशपांडे,ता मूल, जि.चंद्रपूर २.शिवाजी काळे, ता.जुन्नर  ३.सौ दुर्गाताई शुक्रे,पुणे  ४.सौ श्रद्धा शिंदे, इस्लामपूर तसेच  राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान - सौ शैला शिळीमकर, पुणे  आणि, यावेळी निबंध लेखन उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा बक्षीस वितरण व  यथोचित  सन्मान करण्यात येईल  सरकारी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी  पुणे,सातारा व सांगली   यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ !

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ ! दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, 9561551006 सध्या सांगली जिल्ह्यात कायदा-व्यवस्थेचा प्रश्न बिकट होत चाललाय. सगळे अवैध धंदे तेजीत आहेत. खासगी सावकारी, गुटखा, मटका, वाळूचोरी, सेक्स रॅकेट, खून, मारामा-या, ड्रग्ज विक्री, गावठी दारू, बनावट दारू विक्री सगळं सगळं खुलेआम सुरू आहे. सगळं बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंदे करणारे हे सगळे समाजसुधारक सध्या तेजीत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यांचा यथोचित मानसन्मान होतो. त्यांना प्राधान्याने सेवा मिळते. त्यांची योग्य पध्दतीने बडदास्त ठेवली जाते. सगळं कसं सुरूळीत आहे. पण खरी अडचण आहे ती पत्रकारांची. पत्रकार साले माजलेत. काहीही गरज नसताना अवैध धंद्यांची बातमी लावतात. ड्रग्ज पकडल्याची, विक्रीची बातमी लावतात. गांजा विक्रीची बातमी लावतात. सगळं सुरळीत असताना पत्रकार या बातम्या लावून सामाजिक वातावरण कुलूषित करत आहेत. अवैध धंदे करणारे समाजसुधारक आणि पोलिस यांच्यातला सलोखा गरज नसताना बिघडवत आहेत. समाजात जर शांतता हवी असेल तर या दोघांच्यात सलोखा असायलाच हवा ना ? कुठे हाफ मर्डर झाला, कुठे ...

जूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारीजूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारी

इमेज
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राजे श्री छत्रपती महाराज मंडळ जुनगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत ही जयंती साजरी करण्याचा विडा उचललेला आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ======================= जाहीरात

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

इमेज
अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी: डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक साधनाचा व्यवहारिक वापर कसा करावा व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे.  त्याअनुषंगाने नुकतेच १५ फेब्रुवारी रोजी अहेरी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटन येथील गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात मोबिलायझर, रोजगारसेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा या विषयावर ट्रेनर शुभांगी रामगोनवार यांनी सविस्तरपणे माहिती दिली.  अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच नॅसकॉम फाउंडेशनतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे

इमेज
नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑 सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍 आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे  ✍️मुल: तालुका प्रतिनिधी ...  =================== जाहीरात माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली  =================== उन्हाळ्याची चाहूल लागली की जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होते. आणि का होऊ नये? पाणी हे जीवन आहे, जीवन आहे तरच मानव आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन सरकारही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष देत असते. म्हणूनच की काय! सरकारला "सरकार मायबाप" असे संबोधल्या जाते. आणि माय बापानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. अर्थात जनता ही सरकारवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या गरजा पूर्ण करता आल्या नाही तर त्या कुटुंबाप्रमुखाकडे कुटुंबातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. तशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात बघावयास मिळत आहे.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अन...

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इमेज
अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ✍️संतोष गोंगले,तालुका प्रतिनिधी .✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क... मूल: प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्करांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीचा साठा करुन ठेवला आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचान्यांना रेती साठ्याबदल माहिती असताना कारवाई न करता याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यातील जानाळा प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ मध्ये बंधारा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने आवश्यकतेपेक्षा अधिक २५ ते ३० ब्रास अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवला आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी बध्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ ला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन क्षेत्र आहे. यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने मात्र वन्यप्राण्यांच्या जिवाशी खेळून रात्रीच्या सुमारास जवळपास २५ ते ३० ब्रास अ...

आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर

इमेज
आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर 🌆दरारा 24 तास न्युज नेटवर्क ✍️मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी...  अहेरी : खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बरीच मोठी उर्जा मिळते. जिद्द, चिकाटी, संयम, अंगात असलेल्या सुप्तकला गुणांची उधळण करता येते. क्रीकेटसारख्या मैदानी खेळातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यास बरीच मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांघिक खेळाकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा. चिन्ना चालूरकर यांनी केले. येथील राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालयात ४ फेब्रुवारीला शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. सुरेश डोहाने, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत महाविद्यालयातील विविध संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल...

नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद! सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप

इमेज
नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद!  सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप ✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क... चंद्रपूर : बेंबाळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे शुद्ध पाणी आठ गावांतील जनतेला वरदान ठरले होते. परंतु निष्क्रिय ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्याने दोन महिन्यांपासून योजनेचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे. परिणामी नागरिकांना गावातील विहीर-बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नांदगाव हे गाव या योजनेतील मोठे गाव आहे. या गावात राजकीय पुढारी वास्तव्याने असतात. मात्र या गावच्या समस्यांकडे पुढार्‍यांचे दुर्लक्ष झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. नांदगाव ग्रामपंचायतीचे वसुली अभियान थकबाकी जमा झाली असताना सुद्धा विजेचे बिल का भरल्या जात नाही असा प्रश्न माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी, सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील सरपंच निष्क्रिय असल्याचा आरोप माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक महिन्य...

रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

इमेज
रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी         महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे पूर्व विदर्भ संघटक किरण भाऊ पांडव ,विधानपरिषद आमदार, डॉ मनिषाताई कायंदे, यांच्या सूचनेनुसार पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्रजी भोंडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी राय, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, यांच्या मार्गदर्शनात,विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.   यावेळी पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ,बिस्कीट वाटप करण्यात आले,तर प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे येथील रुग्णांना सुध्दा फळ,बिस्कीट पुडे वाटप करून दि. 9 फेब्रुवारी रविवारला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचा ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी! जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ...

इमेज
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी! जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ... मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी, अहेरी: विधानसभा निवडणुकीत भरघोश यश मिळाल्यानंतर विजयाच्या आनंदाने उत्स्फूर्त होऊन गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबुतीने पाय रोवत आहे. शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गावात शिवसेनेची शाखा निर्माण करण्याचा चंग शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी बेलसरे यांनी बांधलेला आहे.  माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली त्यानुसार त्यांनी तालुक्या- तालुक्यांचा दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. सर्व स्तरावर कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाप्रमुख स्वतः हिरहिरीने  जिल्ह्यात झंझावाती दौरे करत आहेत व जनसंपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शिंदे गट गडचिरोली जिल्ह्यात आपले पाय मजबूत केलेले दिसेल यात शंका उपस्थ...

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टिफन बॉक्स वितरित

इमेज
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टीफन बॉक्स वितरित ✍️मनोज गेडाम अहेरी तालुका प्रतिनिधी... अहेरी: महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात तालुकाप्रमुख अक्षय करपे यांच्या पुढाकाराने आलापल्ली व अहेरी येथे ऑटो रिक्षा चालकांना टिफिन बॉक्स वितरित करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अक्षय करपे, अहेरी विभाग कामगार सेनेचे प्रकाश गद्दलवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम पेटेवार, अल्लापल्ली शहर प्रमुख मयूर त्रिनगरीवार,व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा

इमेज
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक:-माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली ======================= शुभेच्छुक:-माननीय मनोज भाऊ गेडाम तालुकाप्रमुख अहेरी जिल्हा गडचिरोली  =======================

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे

इमेज
दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत. सध्या आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. सुलतानपूर, बाबरपूर, बुरारी, त्रिनगर आणि देवळीमध्ये आप आघाडीवर आहे, तर आरकेपुरम, पटपरगंज आणि रोहिणीमध्ये भाजप आघाडीवर आहे.

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे

इमेज
दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत. सध्या आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. सुलतानपूर, बाबरपूर, बुरारी, त्रिनगर आणि देवळीमध्ये आप आघाडीवर आहे, तर आरकेपुरम, पटपरगंज आणि रोहिणीमध्ये भाजप आघाडीवर आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा । गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

इमेज
शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा । गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश ✍️मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी: शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे, सह जिल्हाप्रमुख हेमंत जी जम्बेवार व युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दादा भारसाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व तालुके पिंजून काढण्याचे ठरविले असून तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा गठित करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.  दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्राम भवन येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना जिल्हा सह प्रमुख हेमंत जी जम्मेवार यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.  मार्गदर्शनात पुढे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यात करिता गावागावात शाखा निर्माण करा. तसेच शहरामध्ये प्रभाग रचनेनुसार शाखाप्रमुख, बौद्ध प्रमुख नियुक्त करा आणि शहरांमध्ये प्रभाग रचनेनुस...

मिल्कीपुर उपचुनाव:वोटींग सुरू,3.70 लाख मतदाता करेंगे वोटिंग

इमेज

शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांची अल्लापल्ली, भामरागड येथे भेट व कार्यकर्त्यांशी संवाद।

इमेज
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांची अल्लापल्ली, भामरागड येथे भेट व कार्यकर्त्यांशी संवाद। मनोज गेडाम,अहेरी तालुका प्रतिनिधी... शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला असून नुकताच अल्लापल्ली आणि भामरागड तालुक्याचा दौरा केला. अल्लापल्ली व भामरागड येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला. तालुक्यात व जिल्ह्यात पक्ष मजबूत करून सामान्य गोरगरिबांचे, पीडितांचे, सर्वांचे काम करण्याचे निर्देश देण्यात आले.  राकेश भाऊ बेलसरे यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसैनिकांमध्ये उत्स्फूर्त जिद्द निर्माण झाली असून प्रत्येक कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी तन-मन-धनाने कार्य करण्याची जिद्द व्यक्त केली. शिवसैनिकांनी कामाला लागावे असे निर्देश जिल्हाप्रमुखांनी यावेळी दिले. याप्रसंगी अहेरीचे तालुकाप्रमुख अक्षय करपे, उपतालुकाप्रमुख मनोज गेडाम, उपजिल्हाप्रमुख अंकुश मंडलवार, अभिषेक बाला, आयुष मंडल, नागेश राजनलावार, अमर पेठेवार, गणेश निब्रड, नागेश सडमेक, सोहेल शेख, मयूर त्रिनगरीवार, विष्णू कुशवाह, राजकुमार आत्राम, प्रीतम पेटेवार, सचिन वर...