मनोज गेडाम,अहेरी तालुका प्रतिनिधी...
शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला असून नुकताच अल्लापल्ली आणि भामरागड तालुक्याचा दौरा केला.
अल्लापल्ली व भामरागड येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला. तालुक्यात व जिल्ह्यात पक्ष मजबूत करून सामान्य गोरगरिबांचे, पीडितांचे, सर्वांचे काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
राकेश भाऊ बेलसरे यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसैनिकांमध्ये उत्स्फूर्त जिद्द निर्माण झाली असून प्रत्येक कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी तन-मन-धनाने कार्य करण्याची जिद्द व्यक्त केली.
शिवसैनिकांनी कामाला लागावे असे निर्देश जिल्हाप्रमुखांनी यावेळी दिले. याप्रसंगी अहेरीचे तालुकाप्रमुख अक्षय करपे, उपतालुकाप्रमुख मनोज गेडाम, उपजिल्हाप्रमुख अंकुश मंडलवार, अभिषेक बाला, आयुष मंडल, नागेश राजनलावार, अमर पेठेवार, गणेश निब्रड, नागेश सडमेक, सोहेल शेख, मयूर त्रिनगरीवार, विष्णू कुशवाह, राजकुमार आत्राम, प्रीतम पेटेवार, सचिन वर्धलवार, अविनाश कुच्चलवार, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading