। गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश
✍️मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी
अहेरी: शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे, सह जिल्हाप्रमुख हेमंत जी जम्बेवार व युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दादा भारसाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व तालुके पिंजून काढण्याचे ठरविले असून तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा गठित करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्राम भवन येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना जिल्हा सह प्रमुख हेमंत जी जम्मेवार यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात पुढे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यात करिता गावागावात शाखा निर्माण करा. तसेच शहरामध्ये प्रभाग रचनेनुसार शाखाप्रमुख, बौद्ध प्रमुख नियुक्त करा आणि शहरांमध्ये प्रभाग रचनेनुसार शाखा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख राकेश जी बेलसरे यांनी सुद्धा शासन काळातील योजना लोकांना पटवून देऊन पक्ष वाढीचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला आरमोरी विधानसभा संघटक नारायणजी धक्काते, विधानसभा प्रमुख संतोष गोंदोडे, विधानसभा समन्वयक मधुसूदन चौधरी, राकेश जी बैस विधानसभा समन्वयक, राजेंद्रजी दिवटे तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख संजय चट्टे, शैलेंद्र कोहळे विधानसभा सह संघटक,
सौ अर्चनाताई संतोष गोंदोडे विधानसभा महिला प्रमुख, प्राध्यापक सौरव कांबळे युवा नेते, सौ वैशाली बिजागरे महिला शहर प्रमुख, सौ किरण ताई बर्डे शिवसेना महिला तालुकाप्रमुख वडसा, सौरत्नाताई मेश्राम, आशाताई खोब्रागडे, सिंधुताई जंगम, धनंजय गहेरवार, अश्विन जी तितरमारे, अमरसिंग गहेरवार, विवेक खापरे, आणि तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading