पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप! जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त! चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून? अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल

इमेज
गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप! जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त! चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून?   अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल जिवनदास गेडाम (वि.प्र.) चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटाची रेती अंबरनाथ तालुक्यातून धुमधडाक्यात सुरू असल्यामुळे रस्त्यांची चाळण होत आहे. तसेच अनेक गावातून ही वाहतूक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. धूळ व ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे बेहाल होत असताना व करोडोचा महसूल बुडवला जात असताना महसूल विभाग कारवाई का करत नाही हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे.    गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा रेतीघाट शासकीय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ला मंजूर करण्यात आला आहे. या रेतीची उचल व वाहतूक करण्याची जबाबदारी हैद्राबाद येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आली. मात्र सदर रेतीघाटात शासकीय नियम धाब्यावर बसवून अवैध रेती उपसा व वाहतूक करण्यात येत आहे.  रेती वाहतूक करणारे एवढ्यावरच न थांबता नदीतून मुरूम टाकून चेक लिखितवाड...

तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस उत्साहात साजरा

इमेज
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने २२ मार्च २०२५ रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आशा दिवस आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव व जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा . संगीता भांगरे गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा समूह संघटक (आशा) शितल राजापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगिलवार,डॉ. प्रशांत चौधरी मा. श्री एम. एस . नन्नावरे विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर आदी उपस्थित होते. यावेळी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी, असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांनी सादर केली. यावेळी सर्व विजयी आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न...! स्नेहबंधांचा सुंदर सोहळा, हास्य आनंद फुलवणारा || आपुलकीची ही भेट अनोखी, सर्वांना एकत्र बांधणारा |

इमेज
19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न...! स्नेहबंधांचा सुंदर सोहळा, हास्य आनंद फुलवणारा || आपुलकीची ही भेट अनोखी, सर्वांना एकत्र बांधणारा |          पोंभुर्णा :- जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर येथे दिनांक 22 मार्च 2025 रोजी शैक्षणिक सत्र 2006 ते 2009 या वर्षात शिक्षण घेतलेले विद्यालयीन वर्गमित्र – मैत्रीणी तब्बल 19 वर्षानंतर ची अविस्मरणीय भेट म्हणून स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी, माजी शिक्षक मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित सदस्यांनी एकत्र येऊन आनंद लुटला.                  स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष मा. श्री. विनोदभाऊ अहिरकर अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री मनोज अहिरकर मुख्याध्यापक जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी, श्री विद्याधर बुर्रीवार सर, महिला व बालकल्याण विस्तार अधिकारी एटापल्ली, श्री साईनाथ चिमुरकर सर, प्राध्यापक...

विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन 🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा

इमेज
विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन 🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा ✍️दरारा 24 तास न्युज नेटवर्क महाराष्ट्र  ✍️धर्मपाल कांबळे, (जिल्हा प्रतिनिधी)  चंद्रपूर:सध्या चंद्रपूर शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व चंद्रपूर शहरांमध्ये  मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री व अवैध रित्या विकल्या जाणाऱ्या नकली दारू असेल, देशी कट्टा व जिवंत काडतुस सर्रास पने शहरांमध्ये येत आहेत. मागील दोन दिवसात जिल्हयात दारूबंदी कायद्यान्वये ५७ गुन्हयांची नोंद चंद्रपूर पोलिसांनी केलेली आहे.  3 एप्रिल पासून सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेला येणाऱ्या भाविकांना उत्तम रित्या सुविधा झाल्या पाहिजे व महाकाली परिसरामध्ये पोलीस विभागाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे, व मराठवाड्यातून व विदर्भातून येणाऱ्या सर्व भाविकांचे दर वर्षी समान...

चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांचे कडून सर्व देशवासीयांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
माननीय श्री विनोद भाऊ अहिरकर,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर  महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

उपनगराध्यक्ष अजित भाऊ मंगळगिरीवार यांचे कडून नगरवासीय आणि देशवासीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
माननीय अजित भाऊ मंगळगिरीवार,  उपनगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा  

जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

इमेज
🌑जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही  🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा  🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती  दरारा 24 तास... चंद्रपूर: प्रतिनिधी तुम्ही  दिलेल्या आशीर्वादामुळेच आणि प्रेमामुळे मी या पदापर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, या तुमच्या प्रेमाची परतफेड तुमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारू आणि तुमच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना भाजपा नेत्या अलकाताई आत्राम यांनी केले. त्या जूनगाव येथे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या कुमारी अलका आत्राम यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील जुनगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी अलकाताईंचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून साजर...

मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन ⭐आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित

इमेज
मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन ⭐ आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित  🌍दरारा 24 तास न्यूज नेटवर्क🌍  ✍️संतोष गोंगले, तालुका प्रतिनिधी मुल  ⭐मुल: कृषी विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत 'वॉटरशेड यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया या कार्यक्रमात उपस्थित राहुन आमचा आनंद व्दिगुणीत करावा, हि विनंती. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना. अशोकराव उईके साहेब पालकमंत्री, चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर सदस्य, लोकसभा चंद्रपूर - आर्णी लोकसभा क्षेत्र प्रमुख पाहुणे मा. श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र श्री. विनयजी गौडा जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मिस्टर. राकेश गिरडकर उपसरपंच ग्रा. फिस्कुटी,मा. श्री अजय चरडे उपविभागीय अधिकारी मुल, विवेक जॉन्सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर,मा. श्रीमती निलीमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर,मा. श्री ग...

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..?

इमेज
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..? -एडवोकेट अस्मिता अशोक टिपले वर्धा एडवोकेट, अस्मिता अशोक टिपले वर्धा  =======================      अलीकडे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे. अनेक लाडकी बहिणींना दीड हजार रुपये महिना मिळतात..! आणि काही बहिणींना काही कारणाने त्यांचे अर्ज दाखल होऊन सुद्धा त्यांचा अर्ज बाद करण्यात आले आहे.  दुसरी कडे निराधार महिलांना, घटस्फोटीत महिलांना, ज्येष्ठ नागरिक महिलांना, अशा अनेक महिलांना विविध योजने मार्फत शासनाकडून पैसे मिळतात. म्हणजे शासन त्याची काळजी करते असे म्हणायला हरकत नाही? परंतु पुढे त्यांच्या मुला, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? हा मूळ प्रश्न निर्माण झालेला आहे. अलीकडे सरकारी जिल्हा परिषदच्या अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. मग त्या ग्रामीण/शहरी भागातील असेल आणि पुढील शिक्षण महाग झालेले आहे त्याचे काय? अशा अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? की लाडक्या बहिणीच्या मुला, मुलींना वाऱ्यावर सोडणार? हा चिंतेचा आणि चिंतनाची बाब आहे. लाडकी बहीण म्हणजे नेमकी काय? याची व्याख्या फार मोठी आहे. ...