पोंभुर्णा: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा अंधार वाडा कार्यक्रम तालुक्यात राबवण्यात आला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यात गुरांवरील लंपी आजाररावर प्रतिबंधात्मक लस गावागावात देण्यात यावी याविषयी जाणीव जागृती व्हावी याकरिता चिंतन धाबा या गावापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जनावरांचे गोठे फवारणी करून स्वच्छ आणि साफ करणे यासह काळजी घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
https://youtube.com/shorts/j7odzSC-Sa4?feature=share
https://youtube.com/shorts/j7odzSC-Sa4?feature=share
यावेळी चिंतलधाबा गावात ३२१ रोग प्रतिकार लस देण्यात आली.
यावेळी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी अलकाताई आत्राम, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, भाजपाचे महामंत्री ईश्वर नेताम, माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, सेवा पंधरवडा तालुकाप्रमुख मोहन चलाख, चिंतलधाबाचे उपसरपंच रोशन ठेंगणे, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, गुरुदास पिपरे महामंत्री, रमेश बोभाटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास कानकाटे, पशु परिचारक राजेश्वर कळते, पशुदाता शुभम वाळके व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/j7odzSC-Sa4?feature=share
0 टिप्पण्या
Thanks for reading