चंद्रपूर : पोभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज. येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दि 27/9/2022 रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे यांच्या शुभहस्ते गणेश वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गावचे सरपंच सौ माधुरी चुदरी , पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख , भाजपा मोर्चा अध्यक्ष अजय मस्के, जुंनगाव येथील उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल पाल, भाजपा कार्यकर्ते तथा उपसरपंच नैलेश चिंचोलकर , माजी सरपंच तुळशीराम रोहनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवनाथ मिसार, उपाध्यक्ष सरजना मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम, सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके, भोजराज मिसार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चेतन आरेकार,सुनिल सोपनकार इत्यादी मान्यवर मंडळी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments