Ticker

6/recent/ticker-posts

गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी



जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे - लवकरच दिवाळी सण येत असल्यामुळे आता अनेक नागरीक ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित होत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन खरेदी करीत आहे व त्यांना गिफ्ट कार्डचे बनावट मॅसेजेस देखील त्यांना येत आहे. प्रत्येक नागरीकांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की, गिफ्ट कार्ड हे भेटवस्तु देण्यासाठी आहे पेमेंट करण्यासाठी नाही म्हणून कोणीही अज्ञात व्यक्तीने जर तुम्हाला गिफ्ट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करायला सांगितले किंवा अॅनी डेस्क क्विक सपोर्ट अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले तर ते करु नका, कोणालाही गिफ्ट कार्डच्या नावाने मॅसेजेस फोन आले असेल तर याला प्रत्युत्तर देवू नका आपल्या खात्यावर नेहमी टू स्टेप व्हेरीफिकेशन चे पालन कराव अनोळखी व्यक्तीला आपली खाजगी माहिती, बँकेचे पासवर्ड व आपल्याला येणारे ओटीपी सांगू नका व तुम्हाला आलेले गिफ्ट कार्ड किंवा व्हाउचर कार्डाचे तपशिल कोणालाही शेअर करु नका जेणेकरुन तुम्हाला तुमची आर्थिक फसवणूक होईल म्हणून नागरीकांनी या बाबत सतत सतर्क राहावे असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments