या भागातील लोकांनी आखीव पत्रिका बनविण्यासाठी रक्कम भरलेली आहे.त्यांना देखिल घरकुल मंजूर करण्यात यावे . प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना फक्त एक किस्स रक्कम मिळाली आहे.अजून त्यांचे घरकुलांचे काम अर्धवट अवस्थेत आहे.त्यांना केन्द्राची रक्कम अतिशिघ्र देण्यांत यावी आदीं रास्त मागण्यांसाठी मंगळवार दि.१८ऑक्टोंबरला दुपारी एक वाजता चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद (सिक्की)रामू यादव यांचे नेतृत्वाखाली स्थानिक नगर परिषदेवर शिवसेना सैनिकांचा आक्रोश मोर्चा धडकला.या मोर्चात घरकुल इच्छुक लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विशेषता आजच्या या आक्रोश मोर्चात व सभास्थळी महिलांची व तरूणींची उपस्थिती उल्लेखनीय अशीच होती .
दुपारी तीन नंतर बल्हारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाचे निवेदन सभा मंडपात येवून स्विकारले या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे , उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,तालूका प्रमुख प्रकाश पाठक ,शहर प्रमुख बाबा साहु, युसुफ भाई , जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे , उपजिल्हा संघटक सुवर्णा मुरकुटे,तालुका महिला प्रमुख मिनाक्षी गलगट, शहर संघटक,रंजीता बिरे , अंजली सोमवंशी , प्रभाकर मुरकूटे या शिवाय शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते घरकुल इच्छुक लाभार्थी व नागरीक उपस्थित होते.उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव व प्रदीप मडावी यांची भाषणे झाली त्यांनी बल्हारपूर नगरीतील नागरिकांनी केलेल्या मागण्या ह्या रास्त असल्याचे या वेळी सांगितले.या आंदोलनातून मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading