जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय, मुंबईची श्रध्दा मदन, आफताब पूनावालाच्या प्रेमात बुडून, घरदार आईवडील सोडून लिव्ह इन मध्ये राहायला गेली, आणि लग्नासाठी मागे लागते म्हणून आफताब ने तिला मारून, तिचे 35 तुकडे करून, ते 300 लिटर च्या नवीन फ्रीज मध्ये साठवून, पुढचे 16 दिवस रोज एक एक तुकडा जवळपासच्याच जंगलात नेऊन टाकला, ह्या विचाराने की प्राण्यांनी खाल्ल्यावर कुणाला जे झालंय ते कळणार नाही.
आई वडिलांनी खूप सांगून सुध्दा न ऐकल्याचा इतका भयंकर परिणाम असू शकतो हे श्रध्दा ला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत कळलं ही नसेल.
प्रेम करताना एक लाख वेळा सजगपणे विचार करायला हवाच, की आपलं प्रेम आंधळ नाही ना, डोळ्याला जे दिसतंय तेच सत्य आहे की घरातली मोठी माणसं सांगतायत ते सत्य आहे.
एकदा नक्की विचार करायला हवा !!
0 Comments