गडचिरोली: प्रतिनिधी
स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे नेते माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे विश्रामगृहात विदर्भस्तरीय कोअर कमिटीची बैठक दिनांक 14 मे रोजी संपन्न झाली.
या बैठकीत १ जून 2023 रोजी "गजानन महाराजांना साकडं" व "विदर्भ आक्रोश"मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. हा आक्रोश मेळावा शेगावला दुपारी १ वाजता होणार असल्याची माहिती विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
या बैठकीला विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments