पोंभुर्णा तालुका हा शिक्षणाचे माहेरघर ठरत असतानाच पोंभुर्णा येथील
कुमारी श्रंद्धा रामदास बोबाटे रा.पोंभुर्णा ही नुकत्याच झालेल्या नीट 2023 या परिक्षेत कोणतेही कोचिंग क्लास न लावता प्राविण्य प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून तसेच पोंभुर्णा तालुक्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी याचे औचित्य साधून आज कुमारी श्रध्दा रामदास बोबाटे हिचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रज्वल संजय बोबाटे, व अनिकेत दिनेश इप्पलवार या विद्यार्थ्यांनी दहाविच्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी देवाडा खुर्द येथील सरपंच विलास मोगरकार,शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश कुमार वाळके,पोंभुर्णा नगरपंचायत नगरसेवक गणेश वासलवार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे, सामाजिक कार्यकर्ते धम्माजी निमगडे, सरपंच भालचंद्र बोधलकर, पत्रकार विजय वासेकर , जितेंद्र वासेकर इत्यादिंची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या पुढिल वाटचालीसाठी विलास मोगरकार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Thanks for reading