Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तालुक्यातील एच.एस.सी. आणि एस.एस.सी. गुणवंतांचा सत्कार



पोंभुर्णा: भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा च्या वतीने आज दि. १३.०६.२०२३ ला पोंभुर्णा येथे शैक्षणिक सत्र २०२२-२३ चा एच. एस. सी. आणि एस. एस. सी. परीक्षेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कु. अल्काताई आत्राम भाजपा महामंत्री प्रदेश महामंत्री महिला मोर्चा यांचे अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे
 सुलभा पीपरे नगराध्यक्ष, ऋषी कोटरंगे अध्यक्ष शहर, ओमदेव पाल महामंत्री, ईश्वर नैताम महामंत्री हरीश ढवस महामंत्री, विनोद देशमुख माजी उपसभापती, महेश रणदिवे, दर्शन गोरंटीवार, नगरसेवक मोहन चलाख उपाध्यक्ष, नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, शारदा गुरनुले, रजिया कुरेशी, राजू ठाकरे, गंगाधर नानगिरवार, ठाकरे सर इत्यादी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
      
          कार्यक्रमाचे माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात वर्ग बारावी मधून कु. मयुरी चंद्रशेखर बोरकुटे हीने ७३.१७% गुण मिळवून प्रथम, कु. चैताली संजय पोतराजे हीने ७०.६७ % गुण मिळवून द्वितीय तर कु. श्रुती संदीप ईटकलवार हीने ६७.६७ % गुण मिळवून तृतीय आलेली आहे. विशेष म्हणजे या तीन्ही विद्यार्थीनी ह्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकुळ शाळेच्याच आहेत. त्यामुळे महोदयांनी शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.निमसरकार तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचा विशेष उल्लेख करून अभिनंदन केले.
 
           तसेच वर्ग दहावी मधून अंजली अनिल भडके जनता विद्यालय पोंभुर्णा हा ९३.४०% गुण घेऊन प्रथम, प्रज्वल संजय बोबाटे राष्ट्रमाता विद्यालय देवाडाखुर्द हा ९३ % गुण घेऊन द्वितीय तर साक्षी सागर देशमुख म. ज्यो. फुले. विद्यालय घाटकूळ ही ९०.४० % गुण घेऊन तृतीय आलेली आहे. 

          त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्याकडून
विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेटवस्तू देऊन त्यांच्या गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments