दरारा 24 : सलाडपासून ते प्रत्येक भाजी आणि आमटीमध्ये टोमॅटो हमखास वापरला जातो. टोमॅटोने जेवणाला थोटी आंबट आणि स्वाविष्ट अशी चव येते. त्यामुळे जेवणात टोमॅटो कायम वापरला जातो. या टोमॅटोचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. मात्र टोमॅटोमुळे आता तुमच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. कारण वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे.
टोमॅटोचे दर भीडले गगनाला
टोमॅटोच्या दरात वाढ होउन १८ ते २० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो थेट ६० रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीये. तसेच गृहिणींचे महिन्याभराचे बजेटही कोलमडले आहे. वाशी कृषी उत्पन्ना बाजार समितीमधील दर ४० रुपयांवर पोहचले आहेत.
भाजीपाल्याचे दर कडाडले; सामन्य जनतेला फटका
वाढतं तापमान आणि कडाक्याच्या उन्हाचा परिणाम थेट भाजीपाल्यावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोथींबीर महागली होती. त्यानंतर आता टोमॅटोचे दर वाढले आहेत. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आलेत. माल कमी आणि मागणी जास्त असल्याने बाजारातील टोमॅटोचे दर कडाडले आहेत. आवक कमी झाल्याने भाव वाढले असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
आवक बंद
बाजारात सध्या राज्यातूनच टोमॅटोची आवक होत आहे. बंगळुरुवरुन येणारा माल पूर्णत: बंद करण्यात आलाय. आतापर्यंत बाजारात ४० ते ५० वाहने भरून टोमॅटो आणला जात होता. मात्र सध्या चित्र उलटले आहे. एपीएमसी बाजारात आवक ५० टक्के आहे. मात्र येथे फक्त २० ते २५ वाहनं भरुन टोमॅटो येत आहे.
0 Comments