Ticker

6/recent/ticker-posts

*विद्यार्थ्यांच्या अंगी साहसी वृत्ती निर्माण करणे काळाची गरज*---- *प्रा.डॉ. उमाजी हिरे* *भारतीय जनता युवा मोर्चा नागभीड च्या वतीने "साहस" शिबिराचे आयोजन.* शिबिरात दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग

*विद्यार्थ्यांच्या अंगी साहसी वृत्ती निर्माण करणे काळाची गरज*---- *प्रा.डॉ. उमाजी हिरे*

*भारतीय जनता युवा मोर्चा नागभीड च्या वतीने "साहस" शिबिराचे आयोजन.*

शिबिरात दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभीड----- चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया हे आपल्या विधानसभा क्षेत्रात जनतेसाठी आणि युवकांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात.त्यातच आमदार बंटी भांगडिया यांच्या कल्पकतेतून व भाजपा युवा मोर्चा चे वतीने क्षेत्रातील युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे साहस -2023 हे पाच दिवसीय निःशुल्क निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या चे विद्यार्थी हे मोबाईल मध्ये अधिक गुंतलेले असून त्याचा विपरीत परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिकेतवर झालेला असून त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी अनेक पालक हजारो रुपये खर्च करीत आहेत. मात्र या मानसिकेततून बाहेर काढण्यासाठी अश्या प्रकारच्या निशुल्क शिबिराचे आयोजन भारतीय युवा मोर्चा नागभीड च्या वतीने आयोजित केल्याबबद्दल जनतेतून याचे स्वागत होत आहे.

 या शिबिरामध्ये 14 ते 25 वर्ष वयोगटातील मुला मुलींना आत्मसंरक्षण,जंगल सफारी, ट्रेकिंग,स्विमिंग, कराटे, योगा,डान्स,लाटीकाठी, मार्शल आर्ट,तलवार ढाल, नॉनचोक आणि अन्य मनोरंजक खेळांच्या माध्यमातून विनामूल्य उत्कृष्ठ प्रशिक्षकांद्वारे पाच दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

आज या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संतोष रडके भाजपा तालुकाध्यक्ष,देवानंद बावनकर भाजयुमो तालुकाध्यक्ष, गणेश तर्वेकर चिमूर विधानसभा निवडणुक प्रमुख, उमाजी हिरे माजी नगराध्यक्ष, अजयजी काबरा, पवन नागरे,शिरीष वानखेडे माजी नगरसेवक,प्रशिक्षक
 गणेश लांजेवार ,महेश जिभकाटे ,विवेक गोहने व अन्य कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments