चंद्रपूर:- रेती वाहतूकीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. या बंदीतही रेती तस्कर फायदा उचलत आहेत. रात्री बेरात्री रेतीची तस्करी सुरु आहे. रेतीत मोठा नफा असल्याने पोलीस विभाग, महसूल विभागाला न जुमानता रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांची पेट्रोलिंग सुरु असताना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर पोलिसांनी कार्यवाही केली. दोन चालकांना ट्रक सह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग दरम्यान घुग्घूस येथून पडोलीत येत असताना दोन ट्रकमधून रेतीची वाहतूक होताना आढळली. त्यानंतर पोलिसांना बघताच ट्रक चालकांनी पळ काढला. परंतू पाठलाग करीत अखेर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. दरम्यान अविनाश नारायण ठाकूरीया, सरफराज खान भुरेखान पठाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 30 लाख 40 हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करीत आहेत. या कारवाई ने रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रशासनाची मुक संमती ?
चंद्रपूर जिल्हातील विविध भागात गोणखणीजाची तस्करी दिवस, रात्र सुरू असून या तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केलं आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे. त्यामुळे गौण खनिज तस्करांचे बेधडकपणे अवैध धंदे जोमात सुरू आहे.
मुल, पोंभुर्णा, सावली,गओंडपइपरई तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना सर्वांच्या नजरेसमोर असे गोरख धंदे चालले आहेत.
तस्करीमुळे गावकऱ्यांची झोपमोड…
काही भागात रात्रभर रेती तस्करी सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची झोपमोड होत आहे. गावकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी, त्याची दखल प्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. जिल्हा व तालुका प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून रेती तस्करांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांनी,घरकुलधारकांनी रेटून धरली आहे.
0 Comments