Ticker

6/recent/ticker-posts

गोवर्धन येथून चालतो चोर बीटीचा गोरख धंदा



गोवर्धन येथून चालतो चोर बीटीचा गोरख धंदा

मुल/पोंभुर्णा

प्रतिबंधित असलेल्या बियाणांची विक्री मुल तालुक्यातील गोवर्धन येथून केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवल्या जात असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत.

शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रतिबंधित बियाणे घरपोच मिळत आहेत. हे बोगस बियाणे कृषी केंद्रातही उपलब्ध असल्याचे बोलल्या जात आहे.

चोर बीटी बियाणांचे मुख्य केंद्र गुजरात असल्याचे बोलले जाते. केवळ शेतीवरच आपली उपजीविका भागवणारा परिसरातील शेतकरी कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणाचे तडाखे सोसत आला आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देत शेतकरी वर्ग जगत आहे. मात्र या दुर्दम्य आशावादातही त्याला अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित फटके बसत आहेत. प्रामुख्याने कर्ज उभारून केलेल्या शेतीत  पीकच उगवत नाही. उगवले तर त्याची वाढ होत नाही. असे घडल्यानंतर शेतकऱ्यासमोर काहीही पर्याय उरत नाही.त्याच्या या अवस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या बोगस बियाणांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या नफेखोर कंपन्यांना व दलालांना कायमस्वरूपी पायाबंध घालने नाही गरजेचे आहे.

मागील अनेक वर्षापासून मुल तालुक्यातील गोवर्धन येथे बाहेरगाव वरून आलेला दलाल ठाण मांडून बसला आहे. आणि तिथूनच तो बीयानांची घरपोच विक्री सेवा देतो. अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 

कृषी विभाग व पोलीस विभागीय यांच्या संयुक्त कारवाईने हे घबाड उघडकीस आणावे अशी मागणी शेतकऱ्यांनी व जागरूक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments