Ticker

6/recent/ticker-posts

डॉक्टरांनी केलेल्या कार्याची कदर जिवंतपणी नाही तर... 👉 मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी गिधाडांची शासन औलाद व्यवस्था समजायचे का ❓ 👉 अन्यायग्रस्त डॉक्टरांना शासन न्याय देणार का ?



मुंबई / प्रतिनिधी 
दिनांक -१९ जुन २०२३:-
 भविष्यात जेव्हा प्रामाणिक तज्ञ अभ्यासकांकडुन   कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्यास नम्रपणे अभिवादन केल्याशिवाय पूर्णच होणार नाही. जिवंतपणी केलेल्या त्यांच्या सेवेचे कौतुक, कदर करता येत नसेल, अन्यायग्रस्त असलेल्या डॉक्टरांना आणि इतर आरोग्य  कर्मचाऱ्यांना योग्य न्याय  देता येत नसेल  तर .... फक्त लोणी खाणारी गिधाडांच्या  औलादीची शासन व्यवस्था  म्हणणे चुकीचे ठरणार नाही. किमान शासनाने दुजाभाव करून अन्याय तरी करु नये. डॉक्टरांचं हौतात्म्य विसरता कामा नये. 

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना हजारोंच्या संख्येने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संसर्गजन्य आजाराने बाधित झाले, शेकडो डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झाला. या सर्व प्रकारची जुजबी माहिती सामान्य जनतेला तर आहेच, त्याशिवाय त्यांचा संपूर्ण तपशील डॉक्टरांच्या संघटनेला आहे. पण या देशाची आरोग्य व्यवस्था राबिणाऱ्या आणि  नेतृत्व करणाऱ्या केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मात्र याबाबतची माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. 

डॉक्टरांना योद्धे म्हणा किंवा म्हणू नका, त्यांना त्यांच्या मृत्यू पश्चात कोणता दर्जा द्या अगर देऊ नका. डॉक्टर मंडळी त्यांचं काम नेटाने करित आहे आणि करित राहतील. कोरोना काळातही कर्तव्य बजावताना 'धोका' आहे असे माहित असूनही रोज पीपीई किट परिधान करून रुग्णसेवेस ते सज्ज होते. कोरोना काळातील डॉक्टरांच्या योगदाना बद्दल कुणी प्रश्न उपस्थित करू नये आणि त्यांनीही हे सिद्ध करायची गरज नाही, जर त्यांच्यावर स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ येत असेल तर हा त्यांचा घोर अपमान ठरेल. वैश्विक महामारीच्या काळात डॉक्टर क्षेत्रातील सर्वजण (अॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक,होमिओपॅथी)  अवगत असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कुशल बौद्धिकतेचा वापर करून रुग्णांना इमाने इतबारे उपचार देत आहेत .  

देशातून 41 लाख 12 हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले याचं सर्व श्रेय हे डॉक्टर मंडळीं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जाते. या रुग्णांना बरे करण्या करिता रोज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ जीवाची बाजी लावून काम करतात. जेव्हा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या वस्त्यांमध्ये तपासणी करण्याकरिता जात असतांना त्यांना काही नागरिकांनी शिवीगाळ केली होती, काहीना वेळ प्रसंगी मारहाणही झाली. त्यांनी या गोष्टीचा निषेध केला, मात्र त्याचं काम बंद नाही केले. ते अविरतपणे संघर्ष करित सगळ्या परिस्थितीचा सामना करुन आरोग्य  सेवा देत राहिले. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र, अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, " अगोदरच कामाचा ताण सहन करित आणि विविध समस्यांना तोंड देत सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर प्रामाणिकपणे काम करीत आहेत. 

त्यांच्या बलिदानाच्या कामाचे कौतुक तर नाहीच किमान त्यांच्या या आजाराने मृत्यू झाल्याची दखल केंद्र शासनाला,  महाराष्ट्र शासनाला घ्यावीशी वाटत नाही हे खूपच क्लेशदायक आहे. डॉक्टर कर्तव्य बजावत असतांना मृत्यू पावले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बाबतीची माहिती सांगण्याची वेळ आली तर 'आरोग्य' हा राज्याचा विषय आहे.  मान्य आहे, मात्र या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात या आजाराच्या उपचार पद्धतीचे सर्व निकष, निर्देश, मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आय सी एम आर) मार्फत देण्यात येत होत्या. 

त्याचीच अंमलबजावणी करित आहेत आणि यापुढेही करित राहणार. मात्र किमान डॉक्टरांना सन्मानपूर्वक वागणूक तर द्या. हे फक्त केंद्र सरकारच करते असे नव्हे तर महाराष्ट्र राज्यात काही फारशी वेगळी परिस्तिथी नाही. येथेही वाट्याला तेच दुःख आहे आणि ते आजही भोगत आहोत.""संपूर्ण देशात संघटनेचे जाळे पसरलेले आहे. या काळात  यंत्रणा कामाला लावून, सदस्यांना संपर्क करून किती डॉक्टरांचा मृत्यू कर्तव्य बजावत असतांना कोरोनाच्या संसर्गाने झाला याची माहिती मागवली त्यात 382 डॉक्टरांचे निधन हे कोरोनामुळे झाले असल्याची माहिती पुढे आली. 

 डॉक्टरांच्या मृत्यूंचा आकडा हा खूप मोठा आहे. उपलब्ध असलेली सर्व माहिती  संघटनेच्या केंद्रीय कार्यालयातून केंद्र सरकारला देण्यात आली आहे.  कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्या आणि त्यांना केंद्र सरकाने जी योजना जाहीर केली आहे त्या विम्याचे संरक्षण त्यांना द्यावे अशी मागणी करित आहेत . तशीच मागणी राज्य शासनाकडेही केली आहे. मात्र मागण्यांची दखल घ्यायला वेळ नाही असे काहीसे चित्र आहे. दिल्ली, बिहार आणि ओरिसा राज्यातील सरकारने मात्र डॉक्टरांची ही मागणी मान्य केली आहे.

 राज्य शासनाने किमान या काळात डॉक्टरां सहित किती आरोग्य कर्मचारी या काळात या आजाराच्या संसर्गामुळे बाधित होऊन मृत्युमुखी पडलेत याची नोंद ठेवावी.  " 37 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ संकेत मेहता जेव्हा स्वतः कोरोनाने बाधित होऊन अति दक्षता विभागात (आय सी यू ) उपचार घेत असताना, अचानकपणे 71 वर्षाचे गृहस्थ आय सी यू मध्ये दाखल झाले आणि त्यांना उपचार करण्याकरिता व्हेंटिलेटर ठेवणे गरजेचे होते त्यासाठी उपचाराचा  ट्यूब टाकणे गरजेचे होते. मात्र डॉक्टर येण्यास उशीर लागत असल्याचे समजताच डॉ. मेहता यांनी स्वतःचे ऑक्सिजनचे मास्क काढून बाजूला ठेवत, स्वतःच्या तब्बेतीचा विचार न करता या रुग्णामध्ये ट्यूब टाकण्याचे काम केले.

 कोरोनाचा या संसर्गाचा त्यांच्या फुफ्फुसांवर भयंकर परिणाम झाले असून त्यांना 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण' करावे लागणार  आहे. 
जुलै 20, ला व्यर्थ न हो बलिदान..' 
या शीर्षकाखाली डॉक्टरांनी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावताना जीव पणाला लावला आणि ते कर्तव्य पार पाडताना बलिदान दिले. ... 
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
तुम भूल ना जाओ उनको
इसलिए सुनो ये कहानी. 
 खरं तर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा महत्वाचा असुन प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब असते, त्याची एक सामाजिक व्यवस्था असते. कोरोना सोबत सुरु असलेल्या या युद्धात अनेक योध्यांना युद्ध लढत असताना वीरमरण प्राप्त झाले. मग ते डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, पोलीस विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आणि बी.ई.एस.टी चे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी, या ठिकणी काम करणारे तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांना,  आपले कर्तव्य पार पाडतांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी अनेकजण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत.

 डॉक्टरांनी खरोखरच खस्ता खाऊन, वेदना सहन करून वेळ प्रसंगी जीव घालून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. 
यापूर्वीच्या आणि सध्याच्या काळातही अनेक जण डॉक्टरांना देवाची उपमा देतात, खरं तर ती उपमा कोणत्याही डॉक्टरला मान्य नसते. मात्र त्यांना चांगला माणूस म्हणून शासनाकडून आणि समाजाकडून वागणूक मिळावी ही अपेक्षा असते. मानसिक आणि शाररिक दुःखातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. अशा कठीण प्रसंगात अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करून बरे करीत आहेत. या लढाईत मात्र काही योद्धे कोरोनाची लागण होऊन घायाळ झाले आहेत. त्यांच्या वेदनांवर फुंकर मारली तर त्यांना आवडेल, नाही मारता आली तर नका मारू किमान त्यावर मीठ तरी चोळू नका एवढीच अपेक्षा.

Post a Comment

0 Comments