युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात तुफान हाणामारी होताना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील फेकून मारल्या आहेत. यामुळे बैठकीत एकच तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.
यानंतर काही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली.
दरम्यान, युवक काँग्रेस अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास हे बैठकीनंतर तातडीने निघून गेले. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास टाळाटाळ करताना दिसले. त्यांना या बैठकीबद्दल विचारले असता, त्यांनी बैठकीत काही झाले नसल्याचे सांगितले.
युवक काँग्रेस अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांची तीन वाजता पत्रकार परिषद होती. श्रीनिवास हे पत्रकार परिषद न घेताच निघून गेले. विमान होतं म्हणून श्रीनिवास गेल्याची सारवासारव करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी बैठकीत काही झाले नसल्याचे सांगत हाणामारी झाल्याचे दावे फेटाळले. तर कुणाल राऊत यांना पत्रकारांनी बैठकीतील घटनेबद्दल विचारले असता, त्यांनी बैठकीत काही झालं नाही, असं म्हणत निघून गेले.
0 Comments