मारुतीच्या मंदिरासमोर सहभोजन करण्याची वर्षानुवर्षे परंपरा कायम
जुनगाव येथे आज सहभोजनाचा कार्यक्रम, उद्यापासून भातरोवणीला सुरुवात
पोंभुर्णा: काळाच्या ओघात अनेक रूढी आणि परंपरा लुप्त होत आहेत .आणि अनेक पूर्णपणे लुप्त झालेल्या आहेत. परंतु तालुक्यातील जुनगाव येथे वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक परंपरा कायम असून या माध्यमातून गावातील एकीचे दर्शन होते.
आजच्या दिवशी संपूर्ण गावातील शेतकरी शेतमजूर शेतातील कामे एकजुटीने बंद ठेवतात. सायंकाळी प्रत्येकाच्या घरून प्रत्येक जण आपला जेवण साहित्य गावातील हनुमान मंदिरासमोर नेतात व त्या ठिकाणी एकत्रितरीत्या जेवण करतात.

त्यामुळे गावात किती एकीचे बळ आहे हे लक्षात येते. गावात अनेक जुन्या रुढी आणि परंपरा सण ,त्योहार मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात आणि ते सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन करतात.
0 टिप्पण्या
Thanks for reading