Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा नदीत तीन बालकांना जलसमाधी, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना



वर्धा नदीत तीन बालकांना जलसमाधी, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील तोहोगाव येथे रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 3 मुले बुडाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

तोहोगाव येथील 4 मुले वर्धा नदीच्या पात्रजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते, प्रतीक नेताजी जुनघरे (11) , निर्दोष ईश्वर रंगारी 10, सोनल सुरेश रायपुरे 9 व आरुष प्रकाश चांदेकर 11 हे वर्धा नदीच्या दिशेने पोहायला व मासे पकडण्यासाठी गेले होते.
चव्हाण पैकी आरुष पोहता येत नसल्याने तो पात्राजवळ बसला होता, मासे पकडायचे असल्याने तिघे खोल पाण्यात उतरले, पाण्याच्या अंदाज न आल्याने त्यांचा तोल बिघडला व तिघेही नदीत बुडाले.

भेदरलेल्या आरुषने धावत ,पळत मदतीसाठी गावात पोहचला.त्याने सर्व घटना गावकऱ्यांना सांगितली, गावकऱ्यांनी लगेच नदीच्या दिशेने धाव घेतली. सर्वत्र तिघांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र नदीचा प्रवाह जोरात असल्याने तिघांचा शोध लागला नाही.

बचाव दलाला शोध मोहीम घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याने सकाळी शोध मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता आहे, तिन्ही मुले 9 ते 11 वर्षे वयोगटातील आहे.
तिघे नदीत बुडाल्याची माहिती कुटुंबांना मिळाल्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला.
वृत्त लिहेपर्यंत कुणाचा शोध लागला नव्हता.

Post a Comment

0 Comments