वैनगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी, या मार्गावरील रहदारी ठप्प
अजित गेडाम-
जुनगाव प्रतिनिधी,
दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे काही दरवाजे काल सकाळीच उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील जुनगाव हे गाव आज सकाळपासून पुलावर पाणी असल्यामुळे रहदारी ठप्प झाली आहे.
गोसेखुर्द धरणातून साधारणता दोन लाख 91 हजार 505 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांना व नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जुनगाव ते नांदगाव हा रस्ता बंद झाल्यामुळे सात किलोमीटरचे अंतर आता गंगापूर मार्गे, नवेगाव मोरे व्हाया नांदगाव असा 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading