Ticker

6/recent/ticker-posts

भालचंद्र आनंदराव झरकर यांचा दुर्दैवी मृत्यू। लहान मुले झाली पोरकी- कुटुंबावर दुःखाचे सावट, आज होणार अंत्यसंस्कार

भालचंद्र आनंदराव झरकर यांचा दुर्दैवी मृत्यू। लहान मुले झाली पोरकी-


कुटुंबावर दुःखाचे सावट, आज होणार अंत्यसंस्कार

नांदगाव: विजय जाधव
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. येथील ऑटो चालक-मालक संघटनेचे सदस्य भालचंद्र आनंदराव पाटील झरकर यांचा त्यांचे राहते घरी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 35 वर्ष होते..
     सेवा सहकारी संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले आनंदराव पाटील झरकर यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांना कोवळ्या वयातच कॅन्सर सारख्या भयानक आजाराने ग्रासले. त्यांचेवर अनेक दिवस नागपूर येथे उपचार सुरू होते. काही दिवसापूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले. मात्र आज दिनांक 15 एप्रिल 2024 रोज सोमवारला सकाळी नऊ वाजता चे सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन छोटी छोटी मुले, पत्नी व आई वडील, भाऊ,आप्तेष्ट असा बराच मोठा परिवार आहे.


देवाडा वैनगंगा नदीवर त्यांचे वर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ऑटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सारंग पेदापल्लीवार, यांनी दिली आहे. तसेच सर्व ऑटो चालक-मालक संघटनेचे सर्व सभासद आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांनी अंत्यसंस्काराला सहभागी होऊन भालचंद्र झरकर यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती सारंग पेदापलीवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments