जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस वादळी वारा व गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. तरीही येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या तीन जिल्ह्यांना पावसाचा अरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
0 Comments