Ticker

6/recent/ticker-posts

बोंडेळा खुर्द येथील गावातील रस्त्याची ऐसी तैशी♈ जल जीवन योजनेची कामे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर! सिमेंट रोड मधूनच फोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा-नंदाजी बांगरे यांची मागणी


बोंडेळा खुर्द येथील गावातील रस्त्याची ऐसी तैशी

जल जीवन योजनेची कामे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर!


सिमेंट रोड मधूनच फोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा-नंदाजी बांगरे यांची मागणी

जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन विभागातर्फे जिल्ह्यात युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. मात्र या योजनेचे काम करताना जिल्हा परिषदेने इतर सरकारी विभागाशी कोणताही समन्वय न ठेवल्याने ही योजना ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसत आहे. मुल तालुक्यातील बोंडेळा खुर्द येथील सिमेंट रस्ता ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी न घेता मधोमध सिमेंट रोड फोडून ठेवलेला आहे.

त्यामुळे ही योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. ही योजना राबविताना सरकारी विभागात समन्वय नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे अर्थात अधिकारातील रस्ते आहेत. पाईपलाईन साठी बहुतांश गावातील रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरावस्था बनली आहे. ठेकेदार, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
 येथील जलजीवन योजनेच्या कामाचे ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीला कसलीही पूर्वसूचना न देता सिमेंट काँक्रेट चा रोड फोडून रस्त्याची ऐशी तैशी केली आहे. ठेकेदारावर कारवाई करून रस्ते पूर्ववत करून द्यावे अशी मागणी खुद्द सरपंच मॅडमचे यजमान नंदाजी बांगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments