Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा 2024 हर्षोल्हासात

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा 2024 हर्षोल्हासात


चंद्रपूर : रंजन मिश्रा( मुख्य संपादक )

असोसिएशन ऑफ चंद्रपूर डीस्ट्रीक्ट चंद्रपूर व हॉरीझॉन दू ऑन स्विमिंग क्लब, चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचा परवानगीने प्रशिक्षानार्थ्यांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२४, जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथिल जलतरण स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.


स्पर्धेमध्ये वयोगट निहाय ३ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये वयोगटानुसार २५ मी. ५० मी., १०० मी. अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उ‌द्घाटन प्रदीप ठक्कर, यांच्या हस्ते करण्यात आले व रवी छाबडा स्पर्धे करीता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर जिल्हा जलतरण संघनेचे अध्यक्ष श्रीकांत बल्की उपस्थित होते. तसेच शिवराज मालवी, नामदेव राऊत, विनोद निखाडे, अॅड. तुकाराम डवरे मान्यवर उपस्थित होते. 


सर्व माण्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व तलावाची पूजा करून, नारळ फोडून स्पर्धेचे उ‌द्घाटन करण्यात आले. कार्याक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पिंपळकर प्रस्तावना सिमा बल्की यांनी केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेछा दिल्या. तसेच स्पर्धा आयोजनाकरिता प्रोत्साहन दिले. स्पर्धकांची नोंदणी निलेश कांबळे, ईशा दोरखंडे, आशिष लक्केवार, सानिका मोगरे, दीप्ती वैरागडे, अनिल ददगाळ प्रमुख पंच म्हणून कैलाश शेंडे, रोहन वाढवे, पियुष वैरागडे, स्पर्धा यशस्वी करण्या करीता राहुल बल्की, क्रिष्णा वानखेडे, ओम घुटके, लीना आहुजा, राहुल शुक्ला, खुशाल मांदाडे, सुनील रायपुरे, यशठोंबरे, विनीत खडसे, पांडुरंग दोरखंडे, प्रदीप चौधरी, परमवीर खोब्रागडे, दीपक डंभारे,


चंद्रशेखर राउल, नितीन टोंगे, अनुप मोहितकर, नीलकंठ चौधरी उपस्थितांनी मोलाचे सहकार्य दिले. स्पर्धेचा शेवट बक्षीश वितरण करून करण्यात आला. बक्षीश वितरणाचे सुत्रसंचालन चेतन कंदीकुरवार यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रोंझ ट्रॉफी उपस्थित माण्यावरांचा हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक व स्पर्धकांनी स्पर्धा उत्कुष्ठ रीत्या आयोजित होऊन जलतरण क्रीडे करीता प्रोत्साहात्मक वातावरण निर्माण होऊन उत्साह वाढविल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आभार प्रदर्शन संस्थेचे श्रीकांत बल्की यांनी केले, सर्वांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद दिला.


Post a Comment

0 Comments