लोकसभा निवडणूक आटोपली आता विधानसभेकडे लक्ष- संतोष रावत उतरणार मैदानात
अनेकांना लागलेले निवडणुकीचे डोहाळे
जिवनदास (गेडाम विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर : नुकतीच देशाचे भवितव्य ठरवणारी लोकसभा निवडणूक आटोपली. आता मात्र ही निवडणूक संपताच विधानसभा गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत हे यावेळेस विधानसभा गाठण्यासाठी जनसंपर्क वाढविलेला आहे. ते बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत.त्यांनी बँकेच्या माध्यमातून विविध योजना अमलात आणून शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, लोकांसाठी त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि त्याचाच फायदा त्यांना या विधानसभेत मिळणार अशी चर्चा आहे.
विधानसभेसाठी इच्छुकांची जनसंपर्क मोहिमेला सुरूवात, विधानसभेसाठी इच्छुक सरसावले
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. आगामी विधानसभा पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा करणारे अपक्ष आमदार जोरगेवार यांनी अम्मा टिफिन वितरणाच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू केल्या,तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष सिंह रावत जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी महिलांसाठी राबवून आपला जनसंपर्क वाढवला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून संतोष रावत यांना पसंती दर्शवली आहे. महेश मेंढे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. काँग्रेस नेते व ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर हे सुद्धा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी कंबर कसून आहेत.
इतर इच्छुकही विविध माध्यमातून जनसंपर्क मोहीम राबवत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असलेले अनेक इच्छुक आतापासूनच विविध माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवत आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांचाही समावेश आहे. गावागावात त्यांचेही कार्यकर्ते जोर धरून आहेत. तथापि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीत असल्याने जिल्ह्यातील विधानसभा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातील हे पुढील काळच ठरवणार आहे.
या जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रम्हपुरी व वरोरा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहापैकी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. येथे अपक्ष किशोर जोरगेवार आमदार आहेत. मात्र,
त्यांनी एक वर्षापूर्वीच आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही एका पक्षात प्रवेश करून पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला समर्थन देणारे आमदार जोरगेवार आगामी निवडणूक शिंदे शिवसेनाकडून लढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी जनसंपर्क अभियानावर भर दिला आहे. शहरातील मान्यवर डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपला गाठीभेटी देऊन जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.
या माध्यमातून अम्मा टिफिनचे वितरणही आमदार जोरगेवार यांनी सुरू केले आहे. २०० युनिट मोफत हा मुद्दा आमदार जोरगेवार यांच्यासाठी अडचणीचा विषय आहे. त्यामुळेच जोरगेवार सहा महिन्यांपूर्वीपासूनच तयारीला लागले आहेत. काँग्रेसचे २०१९ चे पराभूत उमेदवार महेश मेंढे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीतून संपर्क सुरू केला आहे. यासोबतच इतर पक्षातील इच्छुक उमेदवारांनीही जनसंपर्कावर भर दिला आहे. यामध्ये भाजपकडून ब्रिजभूषण पाझारे, राहुल घोटेकर, काँग्रेसकडून प्रवीण पडवेकर आहेत. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांनीही तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची सर्वाधिक गर्दी बघायला मिळत आहे.
येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष रावत, प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेसकडून डॉ. विश्वास झाडे, ड. विजय मोगरे, माजी आमदार देवराव भांडेकर, घनश्याम मुलचंदानी, प्रकाश पाटील मारकवार, राजू झोडे, बंडू धोतरे, नंदू नागरकर, नंदू खनके, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगळे, चंदनसिंग चंदेल, संध्या गुरुनुले, शिवसेनेचे संदीप गिहे यांच्यापासून अनेक इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
0 Comments