जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा अजिंक्य योद्धा वैभव पिंपळशेंडे-आशिष कावटवार, शिवसेना तालुकाप्रमुख पोंभुर्णा
दरारा 24 तास
पोंभुर्णा: आपल्ल्याकडे सुगंध आहे हे चंदनाला वनस्पतींचा मेळावा भरवून जाहीर करावं लागत नाही. चंदनाचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो. जो अंतर्यामी असतो तो कृतीतून धावतो. चंदनापरी देह झिजवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारा अजिंक्य योद्धा म्हणजे वैभव पिंपळशेंडे. हे नाव फक्त नावच नाही तर एक पोलादी ब्रॅण्ड आहे.
ध्येयवेडा, ध्येयवादी,अविरत कष्ट करण्याची तयारी असणारा, सामान्य माणसांविषयी वाटणारी कडकड आणि आपुलकी ठेवणारा, रात्री बेरात्री कुणाचीही हाक येवो मदतीसाठी पुढे सरसावणारा,कोण गरीब कोण श्रीमंत कोणताही फरक न करता जसं जमेल तसं त्याला मदत करणं,फोकनाड बाता अजीबात नाही.जे करायचं ते कृतीतून करायचं,चाटुगीरी- चमचेगिरीला अजीबात भिक न घालणारा,आव्हान कोणतेही असो धाडसाने तोंड देण्याची वृत्ती जोपासणारा म्हणजेच वैभव हि ओळख कुण्या भटवादी धोरणाने पुसत नाही किंवा कुण्या पक्षाच्या नसल्यानेही पुसल्या जाणार नाही.
वैभव राजकारणापेक्षा समाजसेवेचा वारसा जोपासतो. विकासकामात,समाजकारणात वैभवने कधीच राजकारण आणलेला नाही.पक्षीय भेदभाव यास कधी थारा दिलेला नाही. प्रत्येकाचे प्रश्न सोडवताना त्यांनी अडल्या नडल्याची सेवा हे एक ब्रिद जोपासलं नव्हे तर तो सत्यात उतरवून एक आदर्श समाजकारणी कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण वैभवने दिले आहे. हेच त्याचे समाजसेवेचे पवित्र व्रत वैभवला तालुक्याच्या पटलावर अढळ स्थान दिलेला आहे. हे स्थान त्याला त्याच्या वेगळ्या कार्य पद्धतीने दिलेले आहे. चाटुगिरी केल्याने नाही. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अखंडपणे लढणारा झुंजार व अजिंक्य योद्धा अशी ओळख वैभव ने निर्माण केली आहे ती पोंभूर्णा तालुक्यात तरी न पुसणारीच आहे. भटगिरी व तुघलकी फर्मान करणारी पक्षाची हि कार्यप्रणाली वैभवाच्या तरी क्रांतिकारी विचाराला पटणारी नाही.तशी कार्यप्रणाली वैभव सहनही करणार नाही.
*वैभवच्या क्रांतिकारी विचाराला खरंच मनापासून सलाम.....!!* ✍️ -आशिष कावटवार, पोंभूर्णा
0 टिप्पण्या
Thanks for reading