बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी, एका एका पक्षात अनेक दावेदार; कुणाकुणाला व्हायचंय आमदार?
चंद्रपूर:-विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. असं असतानाच आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभेसाठी तर डझनभर इच्छुक आहेत. त्यापैकी अनेक जण तर एकट्या काँग्रेसमधीलच आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांकडून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. कोणत्या तालुक्यात किती ताकद आहे? मतदारसंघातील परिस्थिती काय आहे? कोण इच्छुक आहे? प्रत्येक तालुक्यात किती मतदार आहेत? त्यात पुरुष, स्त्रिया आणि तरुणांची संख्या किती आहे याची माहिती घेतली जात आहे.
या माहितीनुसार आराखडे आखले जात आहेत. तर, दुसरीकडे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी आहे. या मतदारसंघातील इच्छुकांची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी कांग्रेस पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला तिकीट द्यायचं यावरून पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. अभिलाषा ताई गावतुरे
बल्लारपूर विधानसभेसाठी भाजप, ठाकरे गट, काँग्रेसच्या इच्छुकांची नावे समोर आली आहेत.भाजप कडून विद्यमान आमदार व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच उमेदवारी मिळणार आहे.
बल्लारपूर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे इच्छुक आहेत. ते जोरदार तयारीलाही लागले आहेत . काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत, सामाजिक कार्यकर्त्या अभिलाषा ताई गावतुरे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, दलित नेते राजूभाऊ झोडे हे इच्छुक आहेत. सर्वाधिक चुरस मात्र काँग्रेसमध्ये दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजु झोडे
======================
जाहिरात
0 टिप्पण्या
Thanks for reading