Ticker

6/recent/ticker-posts

अनुराग ठाकूर यांचा मूल तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध

अनुराग ठाकूर यांचा मूल तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध


चंद्रपूर:लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी विचारधारेतुन आलेल्या भाजप खासदार अनुराग ठाकुर यांनी मा. खा. राहुलजी गांधीं यांना जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा. अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ मुल तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात गांधी चौक मुल येथे व कांग्रेस कमिटी कार्यालयात आज दिनांक २ आगष्ट २०२४ रोजी नारेबाजी करुन तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार सनिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, जिल्हा कांग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, संचालक किशोर घडसे, अखिल गांगरेडीवार, हसन वाढई, बंडूभाऊ गुरनुले, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, सचिव संदीप मोहबे, संदीप म्हस्के, आशिष गेडाम, महिला तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, उपाध्यक्ष समता बनसोड, सहसचिव सीमा भसारकर, नाजुका लाटकर, युवक काँग्रेसचे आकाश दहिवले, विश्र्नु सादमवार, आकाश रोहन, संघर्ष उमरे, ईश्वर टिकले, निखिल चीचघरे, उमेश चलाख, राजू गावतुरे, निखिल पांडव, संदीप, मनोज दवणपल्लीवार, यांचेसह तालुका शहर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments