दुचाकीच्या धडकेत महिला ठार l पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील घटना
पोंभूर्णा : जांबुरवस सणानिमित्त आई व मुलगा माउलीची पुजा आटोपून घराकडे दुचाकीने परत येत असताना त्याच मार्गाने पोंभूर्णा येथून भटारीकडे जात असलेल्या भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने धडकेत एक महिला जागीच ठार झाली व तिघे जखमी झाले. सदर घटना दि. ४ ऑगस्ट रविवारला संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास चिंतलधाबा येथे घडली. कुसुम विठ्ठल चन्नुरवार
वय ७० वर्ष रा. चिंतलधाबा असे मृतक महिलेचे नाव आहे. जांबुरवस सणानिमित्त प्रविण चन्नुरवार आपल्या आईसह माउलीची पुजा आटपून आपल्या दुचाकीने घराकडे परत येत असताना पोंभुर्णा कडून भटारी कडे जाणाऱ्या अमोल शामराव मडावी (३१) रा. खैरगाव ता. कोरपना हा दुचाकीने भरधाव जात असताना चन्नुरवार यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात कुसुम विठ्ठल चन्नुरवार हि महिला गंभीर जखमी झाली. तीला तात्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. जखमी मध्ये प्रविण विठ्ठल चन्नुरवार यादव कुसराम, अमोल शामराव मडावी यांचा समावेश आहे.
======================
जाहिरात
माननीय विनोद भाऊ देशमुख, माझी पंचायत समिती उपसभापती तथा सदस्य पोंभुर्णा
0 टिप्पण्या
Thanks for reading