गोरगरिब,सर्वसामान्यांचा कैवारी, संवेदशील नेता संतोषसिंह रावत
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर:गोरगरीबाचे कल्याण व्हावे यासाठी झटणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. त्यात आशेचा किरण म्हणून, अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून ज्यांचे नाव समोर येते ते म्हणजे संतोष सिंह रावत.
आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून संतोष सिंह रावत यांचे नाव आहे. त्यांच्या एकुण कामाचा आवाका आणि त्यांच्या समाजकारणातील अनमोल कार्याची चर्चा नेहमीच आपणास ऐकावयास मिळते. भारत हा युवकांचा देश आहे. महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे विकसित राज्य आहे. अशा पार्श्वभूमीवर युवकांचे धडाडीचे नेतृत्व संतोष सिंह रावत यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले आहे.आणि त्यामुळेच बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार म्हणून त्यांचे कडे पाहिले जात आहे.पर्यायाने बल्लारपूर विधानसभेतील जनता त्यांच्याकडे आशेने बघत आहे.
युवकांच्या मनातील नेता नेमका कसा असावा याचे एक उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याकडे आपणास सहजपणे दृष्टीक्षेप टाकता येईल. त्यातून त्यांच्या मनातील तळमळ दिसून येईल. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यात केलेले कामे, विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद त्यांचे कडे असल्याने बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवून गोरगरीब सर्वसामान्य महिला तरुण वर्ग यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सिंहाचा वाटा त्यांचा आहे.
गोरगरीबाचे कल्याण व्हावे यासाठी झटणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. त्यात आशेचा किरण म्हणून, अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून ज्यांचे नाव समोर येते ते "संतोष भाऊ" हे त्यांच जनसामान्यांच्या मुखातील लोकप्रिय नाव.
नदी जेव्हा महापुराच्या रूपात गावा-गावात अवतरली तेंव्हा सर्वसामान्य लोक घाबरून गेली होती. अशावेळी संतोष सिंह रावत यांनी लोकांना धीर दिला. ते स्वतः महापुरात लोकांच्या संपर्कात राहिले. लोकांना मदत करत राहिले. हे चित्र फारच कोरीव झाले आहे. आजही नागरिकांच्या डोळ्यात ते चित्र ठळकपणे बसले आहे. निसर्गाचे संकट सांगून येत नाही.वैद्यकीय संकट सांगून येत नाही. अचानकपणे येतं. पण संतोष भाऊ या दोन्ही संकटाशी लोक भिडत असताना सोबत उभे राहिले, राहतात. जागतिक स्तरावर आलेलं कोरोना सारखं संकट भाऊंनी मोठ्या ताकदीने झेललं. लोकांना मदत करणारा माणूस अक्षरशः देवमाणूसच असतो. त्यामुळे त्यांच्या विषयी आदर आणि लोकप्रियता वाढतच राहते. असा गोरगरिबांचा कैवारी, सामाजिक भान असलेला, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा नेता आपल्या मातीला(बल्लारपूर विधानसभेला) लाभला याबद्दल नागरिकांच्या मनात अभिमान आहे.
संतोष भाऊंचे समाजकारण हे नेहमीच लोककल्याणकारी राहिलेले आहे. त्यांची विचारधारा नेहमीच प्रगतीशील राहिलेली आहे.
गोर गरीब जनतेला त्यांच्या कडून अपेक्षा वाटत आलेल्या आहेत. वेळोवेळी एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून ते या अपेक्षा पूर्ण सुध्दा करत आलेले आहेत. लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविण्यासाठी झटत राहणं. त्यांच्या ताटात हक्काची भाकरी येण्यासाठी झटत राहणं. सर्वसामान्यांच्या संकटात उभं राहणं. या ठळक गोष्टी संतोष भाऊंच्या प्रतिमेला बळकटी देणाऱ्या ठरतात. संतोष भाऊ संतोष भाऊ सर्वांचे जवळचे वाटतात. याला कारण ते वेगळे ठरतात म्हणून. त्यांचं हे वेगळेपण त्यांची एक ठळक ओळख झाली आहे.
0 Comments