Advertisement

संतोषसिंह रावत यांचा दणदणीत विजय!



संतोषसिंह रावत यांचा दणदणीत विजय!



चंद्रपूर, प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तालुका निहाय 'अ' गटातून विद्यमान अध्यक्ष माननीय संतोषसिंह रावत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बँकेच्या विकासासाठी सतत कार्यरत असलेल्या रावत यांनी त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारामुळे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयाची पुनरावृत्ती करून दिली.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे मान. संतोषसिंह रावत यांना विजयानंतर मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील सहकारी क्षेत्रातील वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो.

– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या