📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📍 मूल | दिनांक: 10 जून 2025
एका भीषण अपघातात पत्रकार अमित राऊत मृत्यूशी झुंजतोय! - मदतीची आर्त हाक
एक दुर्दैवी अपघात... आणि त्यात अडकलेलं एक प्रामाणिक, होतकरू, गरीब पण धाडसी जीवन!
अमित राऊत, मूल तालुक्यातील एक प्रामाणिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता, आज मृत्यूशी झुंजतोय. अनेकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारा, झेरॉक्सच्या छोट्याशा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा अमित, सध्या अतिदक्षता विभागात जीवन-मृत्यूची लढाई लढतोय.
भीषण अपघात आणि गंभीर अवस्था
अमितच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची स्थिती अत्यवस्थ आहे. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज आहे, मात्र परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचा डोंगर उभा आहे.
मदतीची अत्यंत गरज
आज हा समाजासाठी लढणारा तरुण स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय. त्याच्या वाचण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. तुमचा एक छोटा हात – एक जीव वाचवू शकतो.
🙏 कृपया आर्थिक मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
📞 विवेक मुत्यलवार – 94204 44825
📞 कुमुदिनी भोयर – 77450 96210
💸 UPI / Google Pay / PhonePe द्वारे मदत पाठवा
QR Code स्कॅन करून किंवा वर दिलेल्या क्रमांकांवर पाठवा.
🖊️ प्रेस क्लब, मूल
📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📌
🛑 पत्रकार अमित राऊत मृत्यूशी झुंजतोय!
🙏 तत्काळ आर्थिक मदतीची गरज
🖋️ समाजासाठी लढणारा पत्रकार — आज स्वतःसाठी लढतोय
💸 UPI द्वारे मदत करा – 9420444825 / 7745096210
0 टिप्पण्या
Thanks for reading