– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
वनजमिनीवर अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई!
1 जेसीबी व 3 ट्रॅक्टर जप्त – उत्कृष्ट कामगिरीबद्दल वनरक्षकांचा गौरव
सावली तालुका : (प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क)
सावली वनपरिक्षेत्रातील शिरशी बीटमध्ये वनजमिनीवर अवैध उत्खनन करून त्याची बेकायदेशीर वाहतूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणी तात्काळ कारवाई करत वनविभागाने एक JCB व तीन ट्रॅक्टर ताब्यात घेत मोठी कार्यवाही केली आहे. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या धाडसी आणि तत्पर कारवाईचे नेतृत्व वनरक्षक श्री. महादेव मुंडे (शिरशी बीट) यांनी केले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय विनोद दुर्वे यांनी श्री मुंडे यांचा पुष्पगुच्छ, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार केला.
या वेळी बोलताना माननीय विनोद दुर्वे म्हणाले की,
“वनसंपत्ती ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती असून तिचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. अवैध उत्खनन व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. कोणतीही राजकीय किंवा बाहेरील दबावाची भीती न बाळगता वनविभाग कायद्यानुसार काम करत राहील.”
स्थानिक नागरिकांनीही या प्रशंसनीय कारवाईचे स्वागत केले असून वनविभागाच्या कार्यक्षमतेमुळे अवैध उत्खननावर आळा बसेल, अशी भावना व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर भारतीय वन कायद्यानुसार पुढील तपास सुरू असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सतत सत्याच्या बाजूने, निर्भीड पत्रकारिता
कृपया आमचा चॅनेल Like | Share | Subscribe करा
Vainganga News Live / दरारा 24 तास न्यूज नेटवर्क





0 टिप्पण्या
Thanks for reading