दैनिक चंद्रपूर समाचारमध्ये ‘कॉम्प्युटर ऑपरेटर’ पदासाठी भरती; पेजमेकर व फोटोशॉपचे ज्ञान आवश्यक
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर
दैनिक चंद्रपूर समाचार या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वृत्तपत्राच्या वाढत्या कामकाजामुळे कुशल संगणक ऑपरेटरची गरज भासू लागल्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
वृत्तपत्र व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराकडे पेजमेकर व फोटोशॉप या सॉफ्टवेअरचे आवश्यक तांत्रिक ज्ञान असणे अनिवार्य आहे. वृत्तपत्राच्या डिझाईन, लेआउट तयार करणे, बातम्यांची मांडणी व पेज सेटिंग या महत्त्वाच्या कामांसाठी या कौशल्यांचा उपयोग होणार आहे.
कामाचे ठिकाण:
दैनिक चंद्रपूर समाचार, जटपूरा वार्ड क्र. २, चंद्रपूर
इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा —
मोबाईल: ९४२२१३६६५३
(व्यवस्थापक, दैनिक चंद्रपूर समाचार)
स्थानिक तरुणांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून देत दैनिक चंद्रपूर समाचारने पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading