दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
नांदगाव : नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक नागाजी अलीवार (वय — …) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून तब्येतीची प्रकृती साथ न देत असल्याने त्यांच्यावर गडचिरोली येथील जिला सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल रात्री साधारण दहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नागाजी अलीवार हे गावातील एक मनमिळाऊ, शांत स्वभावाचे आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
आज देवाड बुद्रुक येथील नदी घाटावर दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. अंतिम यात्रेसाठी गावातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नागाजी अलीवार यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली…
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क





0 टिप्पण्या
Thanks for reading