बल्लारपूरात काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अल्का वाढई यांची प्रचार मोहीम जोमात
बल्लारपूर : प्रशांत रणदिवे, तालुका प्रतिनिधी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अल्का अनील वाढई यांनी बुधवारी चिन्ह वाटप होताच प्रचाराचा धडाका सुरू केला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन भेटी देत मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अल्का वाढई यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. अनील वाढई, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व
कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या शहराध्यक्ष देवेंद्र आर्य व अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात प्रचार मोहीम वाढविण्यात येत असून, सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नागरिकांना भेटून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पक्षाच्या नेतृत्वातून करण्यात येत आहे.
अल्का वाढई यांची मजबूत पार्श्वभूमी
बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अल्का वाढई यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांचे पती डॉ. अनील वाढई हे नामांकित वैद्यकीय सेवक तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागील ११ वर्षांपासून संचालक आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे.
मतदारांमध्ये असे मत व्यक्त केले जात आहे की, अल्का वाढई यांची उमेदवारी काँग्रेस पक्षासाठी नवसंजीवनी ठरणार असून, बल्लारपूरमध्ये पुन्हा काँग्रेसचे सुवर्णदिवस परत येतील.
आ. विजय वडेट्टीवार यांची आज प्रचारसभा
काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अल्का वाढई आणि ३२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी विधीमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांची भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही सभा राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरात घेण्यात येईल.
प्रचाराला वेग
काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या विजयसाठी अल्का वाढई यांच्या नेतृत्वाखाली प्रचारमोहीम जोमात सुरू असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरभर प्रचारफेऱ्या, जनसंपर्क मोहीम व बैठकींद्वारे पक्ष कार्यकर्त्यांनी वातावरण तापवले आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील घडामोडी सर्वप्रथम…





0 टिप्पण्या
Thanks for reading