Advertisement

काँग्रेसच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ निवडणूक रिंगणात! प्रचारात जोरदार आघाडी – दिग्गज नेत्यांचा पाठिंबा

 

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुल नगर परिषद निवडणूक 2025


काँग्रेसच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ निवडणूक रिंगणात!

प्रचारात जोरदार आघाडी – दिग्गज नेत्यांचा पाठिंबा

मुल : आगामी मुल नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थ यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.


एकता समर्थ यांच्या प्रचाराला काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी समर्थन देत थेट मैदानात उतरले आहेत. माजी आमदार, जिल्हा स्तरावरील नेते, नगरसेवक, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय प्रचारात सहभागी होत आहे. शहरातील विविध भागात दररोज प्रचार सभा, पदयात्रा, घरदार संपर्क अभियान आणि जनतेशी संवाद कार्यक्रम राबविले जात आहेत.

प्रचारादरम्यान जनतेशी संवाद साधताना एकता प्रशांत समर्थ यांनी "पारदर्शक प्रशासन, स्वच्छ शहर, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा सुधारणा, रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक विकास" हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावर बोलताना समर्थ म्हणाल्या, "मुल शहराच्या विकासकामांना नवीन दिशा देणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जिंकणे हे आमचे ध्येय आहे. जनतेच्या साथीनं आम्ही नगरपरिषदेत सत्ता स्थापन करू."

निवडणूक प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात सर्वत्र काँग्रेसच्या झेंड्यांनी, पोस्टर्स, फलक व आकर्षक रॅलींनी वातावरण रंगले आहे. विरोधकांवर जनतेला विश्वास नसल्याचा सूर नागरिकांच्या प्रतिक्रियेतून येत असून एकता समर्थ यांच्या बाजूने अनुकूल लाट असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.


📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
✍️ संपादकीय विभाग – मुल शहर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या