दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा, दि. 7 डिसेंबर 2025
वनविभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या अनिश्चित आमरण उपोषणास दहा पेक्षा अधिक दिवस उलटले तरीही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय—8 डिसेंबरला रास्ता रोको चक्का जाम
पोंभुर्णा तालुका : पोंभुर्णा तालुक्यातील वनविभाग कार्यालयासमोर दि. 26 नोव्हेंबर 2025 पासून सुरू असलेल्या अनिश्चित आमरण उपोषणाला आज 10 ते 12 दिवस पूर्ण झाले असूनही प्रशासन व संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता सावित्रीबाई फुले चौक, पोंभुर्णा येथे रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीत सर्व समाज बांधव व कार्यकर्त्यांनी एकमताने ठाम भूमिका घेतली की न्याय, हक्क व अधिकारांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेतली नाही, तर तीव्र आंदोलन अनिवार्य ठरेल.
कार्यकर्त्यांनी सांगितले की आदिवासी बहुजन समाजाच्या मूलभूत हक्कांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर चर्चा होऊनही कोणतीही खात्रीशीर हमी मिळालेली नाही. त्यामुळे आता संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सर्व पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी-बहुजन समाज बांधवांना आवाहन केले आहे की —
“आपल्या न्याय हक्कासाठी, हक्काच्या आवाजासाठी उद्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे.”
आवाहन
“जाग उठो गोंडवाना के लोगो!
अब सोने का वक्त नहीं!
जो अपने न्याय-हक्क-अधिकार के लिये काम न आये,
वो गोंडवाना का रक्त नहीं!”
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क करिता — विशेष प्रतिनिधी




0 टिप्पण्या
Thanks for reading