Advertisement

📢 गोंडी धर्म भूमी कोयली कचारगड जत्रा महोत्सव २०२६ – आढावा बैठक उत्साहात संपन्न 📢

 

📢 गोंडी धर्म भूमी कोयली कचारगड जत्रा महोत्सव २०२६ – आढावा बैठक उत्साहात संपन्न 📢



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गोंडी धर्म भूमी कोयली कचारगड जत्रा महोत्सव २०२६ च्या अनुषंगाने जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी
गोंडवाना भवन, गोंडवाना नगर, कोसारा (जि. चंद्रपूर) येथे आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.


या महत्त्वपूर्ण बैठकीस
🔹 जनसेवा गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. प्रा. धिरज पुरुषोत्तम सेडमाके
🔹 चंद्रपूर–गडचिरोली लोकसभा अध्यक्ष मा. बंडू मडावी
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जत्रा महोत्सवाचे नियोजन, विविध समित्यांची रचना, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच यशस्वी आयोजनासाठीची पुढील कार्यपद्धती यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

कोयली कचारगड जत्रा महोत्सव हा गोंडी धर्म, संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक असून हा महोत्सव अधिक भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

आढावा बैठकीनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


गोंडी धर्म, संस्कृती व अस्मितेसाठी एकजूट
💐 जनसेवा गोंडवाना पार्टी – समाजहितासाठी सदैव कटिबद्ध 💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या