दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
“बल्लारपूर नगर पालिका में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) का नगराध्यक्ष ही चुना जाएगा” — सिक्की भैय्या यादव का विश्वास
बल्लारपूर : आगामी बल्लारपूर नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांनी जोरदार मोहीम उभी केली आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून जनतेत मोठी लाट निर्माण झाल्याचा दावा बल्लारपूरचे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते सिक्की भैय्या यादव यांनी केला आहे.
शिवसेना नेते श्री. सिक्की यादव यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर नगरपालिकेची निवडणूक लढविण्यात येत असून, “यावेळी बल्लारपूर नगरपालिकेवर भगवा फडकणारच. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा नगराध्यक्षच निवडून येईल याबाबत आम्हाला आणि सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की —
“जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. शहरातील विकास, नागरी सुविधा, रोजगार, पाणी, स्वच्छता, रस्ते यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची हमी आणि विकासाचा ठोस आराखडा आमच्याजवळ आहे. 22 डिसेंबर रोजी जनता आमच्या कार्याचा मुग गाठी बांधून शिवसेना उमेदवाराला विजयी करेल, आणि निश्चितच नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार आहे.”
कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह होता .‘बल्लारपूरमध्ये यावेळी शिवसेनाचाच विजय निश्चित’ अशी भावना व्यक्त केली जात आहे.
शेवटी सिक्की भैय्या यादव यांनी सर्व नागरिकांना विनम्र आवाहन केले की
“लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने मतदान करून आपला हक्क बजावला आणि व आमच्या बाजूने ठाम उभे राहीले.” सर्वांचे मनापासून धन्यवाद...
📌 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
बातमी संकलन — विशेष प्रतिनिधी
🙏📰





0 टिप्पण्या
Thanks for reading