दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सविस्तर व सुधारित बातमी
नांदगावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय नारायणराव जी अल्लीवार यांचे दुःखद निधन
नांदगाव :
नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय नारायणराव जी अल्लीवार (वय 103 वर्षे) यांचे दि. 07 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.00 वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
नारायणराव अल्लीवार हे अत्यंत मनमिळाऊ, शांत स्वभावाचे, समाजहितासाठी सदैव पुढाकार घेणारे आणि ग्रामविकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने नांदगावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावामध्ये त्यांनी उभारलेली सामाजिक परंपरा आणि विकासाची दृष्टी गावकऱ्यांसाठी आजही प्रेरणादायी आहे.
त्यांच्या पश्चात सून, मुलगी, नातू इत्यादी असा मोठा आप्तपरिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंत्ययात्रा
आज दि. 08 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार असून, गावातील सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
💐🙏 ॐ शांती 🙏💐
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
आपली बातमी, आपला हक्क
🙏💐 विजय जाधव, प्रतिनिधी





0 टिप्पण्या
Thanks for reading