दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
🚨 चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात प्रशासनाचे ठोस आवाहन 🚨
छळ, धमकी, जादा व्याज आणि बेकायदेशीर वसुली सहन करू नका – तक्रार करा, न्याय मिळवा
चंद्रपूर | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी परवाना नसलेल्या सावकारांकडून सामान्य नागरिकांचा छळ, धमकी, जादा व्याज आकारणी व बेकायदेशीर वसुली केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी भीती न बाळगता थेट प्रशासनाकडे तक्रार करावी, असे ठोस आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
📜 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार
➡️ परवाना नसलेली सावकारी हा गंभीर गुन्हा आहे.
➡️ जादा व्याज आकारणे, धमकी देणे, मानसिक किंवा शारीरिक छळ करणे, कोऱ्या कागदांवर सह्या घेणे, मालमत्ता बळकावणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत.
➡️ दोषी सावकारांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाऊ शकते.
📍 तक्रार कुठे करावी?
✔️ जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
✔️ तहसील कार्यालय (आपल्या तालुक्यात)
✔️ सहाय्यक / उप निबंधक, सहकार विभाग
✔️ नजीकचे पोलीस ठाणे
📞 टोल फ्री हेल्पलाईन:
➡️ 1800 233 8691
🔐 तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
⚖️ तक्रारीनंतर चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
👉 अनेक वेळा भीतीपोटी किंवा समाजदबावामुळे नागरिक तक्रार करत नाहीत. मात्र, अशा गप्प बसण्यामुळे अवैध सावकारांचे फावते. त्यामुळे पीडितांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
✊ घाबरू नका – प्रशासन तुमच्या सोबत आहे!
अवैध सावकारीविरोधात लढा देण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे व कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading