Advertisement

बल्लारपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती उत्साहात साजरी

 

बल्लारपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती उत्साहात साजरी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क / प्रशांत रणदिवे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर


बल्लारपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत संत. श्री संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती सोमवार, दि. ८ डिसेंबर रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक दिंडी मिरवणूक, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने यंदाची जयंती सोहळा अविस्मरणीय ठरला.

सकाळी संताजी भवन येथून दिंडीचे प्रस्थान झाले. लहान बालकांकडून साकारण्यात आलेल्या विविध संतांच्या वेशभूषा, देखावे, घोडे, पालखी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिंडीचा संच गांधी चौक व महादेव मंदिर मार्गाने शहरातून फिरला. शेगाव येथील वारकरी भजन मंडळीच्या भजन व अभंगगायनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.


यानंतर संताजी भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. श्याम हिवरकर, कृष्णाजी गुल्हाने (नगर अभियंता, नगर परिषद बल्लारपूर)प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मंडळाच्या महिलांनी स्वागतगीताने करण्यात आली.

मंचावर मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश बेले, महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. भाग्यश्री रागीट (गवते), युवक मंडळाचे अध्यक्ष मोहित इटनकर, युवती मंडळाच्या उपाध्यक्षा कल्याणी पोहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात श्री बेले यांनी संताजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व व समाजहिताचे विचार मांडले.

कार्यक्रमात दहावी-बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच दिंडीत संतांच्या वेशभूषेत सहभाग घेतलेल्या मुलांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सौ. वैष्णवी जुमडेस्वाती बाभुलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुष्पा गिरडकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता भाविकांसाठी आयोजित महाप्रसादासह करण्यात आली.

या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर घुबडे, सचिव राजेश खनके, कोषाध्यक्ष मोहन कळंबे, सहसचिव अनिल ढोक, ज्ञानेश्वर कामडी, अँड. बंडू खनके, जयंत सुरकर, मधूकर शेंडे, चंद्रशेखर लिचोडे, विजय बाबुलकर, राजूभाऊ गवळी, किसनराव लोहबडे तसेच संत. श्री संताजी महिला मंडळ, युवती मंडळ, युवक मंडळ यांच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


📌 विशेष आकर्षण

  • शीगाव वारकरी मंडळाचे भजन-अभंग
  • संतांची पालखी, घोडे व देखावे
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
  • पुस्तकाचे लोकार्पण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या