Advertisement

भरारी विकासाची… चिंतलधाबाला नवी ओळख- ६१.१९ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमिपूजन – ग्रामीण आरोग्यसेवा होणार सक्षम- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन – महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

 

📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क –  📰


भरारी विकासाची… चिंतलधाबाला नवी ओळख-

६१.१९ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमिपूजन – ग्रामीण आरोग्यसेवा होणार सक्षम-

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन – महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क – तालुका प्रतिनिधी, पोंभुर्णा | दि. ७ डिसेंबर

चिंतलधाबा गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देत ६१.१९ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे ग्रामीण नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा आता गावातच सुलभपणे उपलब्ध होणार असून आरोग्य क्षेत्रात चिंतलधाबा एक मजबूत पाऊल टाकत आहे.


त्याच कार्यक्रमात महिला बचत गटांच्या कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या रोजगाराचे नवे दालन खुले होणार असून स्वावलंबनाच्या दिशेने मोठी झेप ठरणार आहे.


पायाभूत सुविधांना मोठा आधार

गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मंजूर ६१.19 लाखांच्या निधीतून उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे उपचारासाठी आता दूरवर जाण्याची वेळ नागरिकांना येणार नाही.

स्मशानभूमीसाठी जमिनीचा प्रश्नही तात्काळ निकाली काढण्याचा निर्णय कार्यक्रमात घेण्यात आला. तसेच बांधकाम योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.



सौरऊर्जेतून आत्मनिर्भर गावाकडे पाऊल

महावितरणसोबत सविस्तर चर्चा करून चिंतलधाबाच्या विजेच्या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. उथळपेठ हे गाव पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे पहिले गाव ठरल्यानंतर चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव बनविण्याचा मानस आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.



महिलांसाठी स्थिर रोजगाराची संधी

विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ मुंबई यांच्या संयुक्त सहकार्यातून कार्पेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सहा महिन्यांत महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.



आरोग्यसेवेत क्रांतिकारी कार्य

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यात:

  • १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • ३२ स्मार्ट आरोग्य केंद्रे
  • ६ स्मार्ट रुग्णालये
  • मेडिकल कॉलेज, कॅन्सर रुग्णालय उभारणी
  • ७.५ कोटी एमआरआय मशीन, १.५ कोटी मोबाईल कॅन्सर व्हॅन

यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.



कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

प्रदेश महामंत्री अलकाताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदी मान्यवर उपस्थित होते.



चिंतलधाबा सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे…

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने व जबाबदारीने कार्यरत राहू,” असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात व्यक्त केला.



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या