अनेक दिवसांपासून बंद असलेला बोरवेल सुरू; जून गावातील सर्व समाजातील नागरिकांना दिलासा
जूनगाव | दिनांक : 24 डिसेंबर 2025
जून गाव येथील आदिवासी वाड्यातील बोरवेल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. विशेष म्हणजे हा बोरवेल केवळ आदिवासी वाड्यासाठीच नव्हे, तर गावातील सर्व समाजातील नागरिक व महिलांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. त्यामुळे बोरवेल बंद असल्याने महिलांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब सरपंच राहुल भाऊ पाल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य महामंत्री अलकाताई आत्राम यांच्या सहकार्याने संबंधित दुरुस्ती यंत्रणेशी संपर्क साधला आणि त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले.
आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी बोरवेल/हातपंपची यशस्वी दुरुस्ती करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सरपंच राहुल भाऊ पाल हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीमुळे काम वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
बोरवेल सुरू होताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व समाजातील नागरिक व विशेषतः महिलांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याबद्दल सरपंच राहुल भाऊ पाल व अलकाताई आत्राम यांचे आभार मानले आहेत.
लोकांच्या मूलभूत गरजांकडे संवेदनशीलतेने पाहून तात्काळ निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून सरपंच राहुल भाऊ पाल यांची गावात प्रशंसा होत असून, अशा लोकाभिमुख कार्यामुळे ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading