Advertisement

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाला सुरुवात – नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा : अलका आत्राम यांचे आवाहन

 

दरारा 24 तास | विशेष बातमी

📍 पोंभुर्णा तालुका

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाला सुरुवात – नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा : अलका आत्राम यांचे आवाहन


पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी तहसील कार्यालय पोंभुर्णा मार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा 1” अंतर्गत विविध गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रशासकीय प्रश्न सोडवणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

तहसील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील ठिकाणी शिबिरे होणार आहेत –
📅 14 मार्च 2026 – ग्रामपंचायत परिसर, आंबेधानोरा
📅 10 एप्रिल 2026 – ग्रामपंचायत सभागृह, नवेगाव मोरे
📅 17 एप्रिल 2026 – ग्रामपंचायत सभागृह, चिंतालधाबा
📅 08 मे 2026 – राजराजेश्वर सभागृह, पोंभुर्णा

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, 7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व आठ अ उतारे वाटप, संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, सर्वांसाठी घरकुल अंतर्गत पट्टे वाटप, रेशन कार्ड वितरण, अ‍ॅग्रीस्टॅक योजना व इतर प्रशासकीय कामांचे निराकरण करण्यात येणार आहे.

महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

14 मार्च 2026 रोजी आंबेधानोरा येथे होणाऱ्या शिबिरात महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर, आरोग्य सल्ला तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत 7/12 उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदणी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध विभागांचे विशेष स्टॉल

शिबिरामध्ये विविध विभागांकडून खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –

🔹 पशुसंवर्धन विभाग

  • पशुधनाचे मोफत लसीकरण
  • जंतनाशक औषधांचे मोफत वाटप
  • मिनरल मिक्स्चर वितरण

🔹 कृषी विभाग

  • शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन व माहिती

🔹 भूमी अभिलेख विभाग

  • स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप

🔹 India Post Payments Bank (IPPB)

  • नवीन खाते उघडणी
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना नोंदणी

🔹 आरोग्य विभाग

  • आयुष्मान भारत कार्ड नोंदणी
  • ABHA कार्ड नोंदणी

🔹 इतर सुविधा

  • घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेतीसाठी टी.पी. वाटप
  • आधार कार्ड अपडेट
  • पीएम किसान योजना तक्रार निवारण
  • संजय गांधी निराधार योजना तक्रार निवारण
  • युवकांसाठी करिअर मार्गदर्शन हेल्प डेस्क
  • माविम अंतर्गत बचत गटांचे विक्री स्टॉल

या शिबिरांमुळे महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून प्रलंबित प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, भाजप प्रदेश महामंत्री अलका आत्राम यांनी पोंभुर्णा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या